शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आधार अपडेटचे प्रमाण ७५ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:10 IST

गडचिराेली : विविध याेजनांच्या लाभासाठी व अनेक महत्त्वाच्या कामात पुरावा म्हणून आधारकार्डचा वापर केला जाताे. केंद्र व राज्य सरकारने ...

गडचिराेली : विविध याेजनांच्या लाभासाठी व अनेक महत्त्वाच्या कामात पुरावा म्हणून आधारकार्डचा वापर केला जाताे. केंद्र व राज्य सरकारने प्रत्येक नागरिकांसाठी आधारकार्ड हे ओळखपत्र अत्यावश्यक केले आहे. गडचिराेली जिल्ह्यात सर्व मिळून शासनमान्य अधिकृत ९० पेक्षा अधिक आधारकार्ड केंद्रे आहेत. सद्य स्थितीत ५५ आधारकार्ड केंद्रे सुरू आहेत. गडचिराेली जिल्ह्यात आधारकार्ड अद्ययावत करण्याचे प्रमाण ७५ टक्के आहे.

केंद्र व राज्य सरकारने आधारकार्डला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. नागरिकांकडे विविध प्रकारचे ओळखपत्र आहेत. यामध्ये वाहन परवाना, निवडणूक ओळखपत्र, बॅंक पासबुक, काम करीत असलेल्या अस्थापनाकडून मिळालेले ओळखपत्र, रेशन कार्ड व इतर अनेक प्रकारची ओळखपत्रे पुरावा म्हणून जाेडली जातात. मात्र शासनाने आधारकार्ड अत्यावश्यक केले आहे. आधारकार्डाशी बॅंक खाते क्रमांक व गॅस सिलिंडरसाेबत लिकिंग केले. शिवाय शिधापत्रिकाधारकांचे आधारकार्ड क्रमांक लिकिंग केले आहे. विविध याेजनांच्या अंमलबजावणीत सुसूत्रता यावी, दस्तावेजातील गैरप्रकार थांबविता यावेत, एकाच ओळखपत्रावरून सर्व बाबींची पडताळणी करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे शासनाने प्रत्येक नागरिकाला आधारकार्ड अत्यावश्यक केले आहे.

गडचिराेली जिल्ह्यात राज्य सरकारचे अर्थात जिल्हा प्रशासनाचे एकूण ५१ अधिकृत आधारकार्ड केंद्रे आहेत. यापैकी ३२ केंद्रे सुरू असून, ११ केंद्रे बंद आहेत. विविध बॅंकांची ११, तर पाेस्ट विभागाची ९ केंद्रे आहेत. याशिवाय स्कूल एज्युकेशन ॲण्ड स्पाेर्टस‌् एजन्सीची मान्यता असलेले गडचिराेली व धानाेरा येथील गटसाधन केंद्रात आधारकार्ड केंद्र आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेले सीएससी म्हणजे काॅमन सर्व्हिस सेंटरचे एक आधारकार्ड केंद्र आहे.

बाॅक्स...

काेणाचे किती केंद्र

जिल्हा प्रशासन ५१

बॅंक ११

पाेस्ट ऑफिस ९

बाॅक्स...

यासाठी करावे लागते आधार नूतनीकरण

- नवजात बालकांच्या बाेटांचे ठसे याेग्यरित्या उमटत नाहीत. शिवाय डाेळ्यांचा लॅटिना घेता येत नाही. त्यामुळे बालकांचे आधारकार्ड पाच वर्षानंतर अपडेट करावे लागते. त्यानंतर बालक जसजसा माेठा हाेताे, तशा बाेटाच्या रेषा बदलतात. त्यामुळे १५ वर्षांनंतर बालकाचे आधारकार्ड पुन्हा अपडेट करावे लागते. पाच वर्षांपर्यंत अपडेटसाठी काेणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

- याशिवाय जुनी माहिती, पत्ता, माेबाईल नंबर, ई-मेल आयडी, लग्नानंतरचे नाव, वय, जन्म तारीख, छायाचित्र आदींची आधारकार्डमध्ये सुधारित नाेंदणी करण्यासाठी आधारकार्ड अपडेट करावे लागते. बायाेमेट्रिक व डेमाेग्राॅफिक अशा दाेन प्रकारचे बदल आधारकार्डमध्ये करता येतात. बायाेमॅट्रिकसाठी १०० रुपये व डेमाेग्राॅफिक्ससाठी ५० रुपये अपडेट शुल्क घेतले जाते.