शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाकडून सरपंचांना ७५ टक्के अनुदान

By admin | Updated: October 28, 2014 22:56 IST

राज्यातील ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांच्या मानधन व बैठक भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाकडे महिला राजसत्ता आंदोलनाच्यावतीने करण्यात आली होती.

गडचिरोली : राज्यातील ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांच्या मानधन व बैठक भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाकडे महिला राजसत्ता आंदोलनाच्यावतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत सरपंचांना गावातील लोकसंख्येनुसार राज्यशासन ७५ टक्के अनुदान तसेच उर्वरित २५ टक्के रक्कम ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून दिले जाणार आहे, अशी माहिती राजसत्ता आंदोलनाच्यावतीने देण्यात आली आहे.सरपंचांना त्या गावातील लोकसंख्येनुसार अनुदान दिली जाणार आहे. शिवाय ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठक भत्त्यात तब्बल ८ पटीने वाढ करण्यात आली आहे. सदर भत्ता २५ रूपयावरून २०० रूपये करण्यात आले आहे. २ हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला १ हजार रूपये मानधन व ७५० रूपये अनुदान, २ हजार ते ८ हजार लोकसंख्येच्या ग्रा. पं. सरपंचास १ हजार ५०० मानधन तर १ हजार १२५ रूपये अनुदान, ८ हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच्यास २ हजार रूपये मानधन व १ हजार ५०० रूपये अनुदान दिले जाणार आहे. ग्रा. पं. सदस्यांना वर्षातील १२ बैठकांनाच सदर भत्ता दिला जाणार आहे. प्रती बैठक २०० रूपये प्रमाणे हा भत्ता मिळणार आहे. ग्रामपंचायतमधील सरपंचांना मोफत बस प्रवासाची पास देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने लावून धरली जात आहे. सरपंचांना मोफत बस प्रवास मिळाल्यास जिल्हा व तालुका मुख्यालयात विविध कामांचा पाठपुरावा करण्यासाठी मदत होणार आहे. सरपंचांना मोफत बस पास उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणीही महिला राजसत्ता आंदोलनाच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा संघटक ज्योती मेश्राम, अर्चना जनगणवार, ममता शिवणकर, मंदा तुरे, अर्चना रामटेके, वैशाली पोरेड्डीवार, मनिषा फटाले, ममता भोयर, माला बोदलकर, मंदा रोहणकर, माया मानकर, अर्चना पोटे, पुष्पा कुमरे, संगीता अंबादे, लता कोलते, निता साखरे यांनी केली आहे. यापूर्वी गावपातळीवरील विकास कामे करण्यासाठी अत्यल्प मानधन मिळत असल्यामुळे सरपंच व सदस्यांना अडचण भासत होती. (शहर प्रतिनिधी)