शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७० टक्के मतदान

By admin | Updated: October 15, 2014 23:16 IST

गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान झाले. सरासरी ७० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक

तीन ठिकाणी ईव्हीएम मशीन पडल्या बंद : दुर्गम भागात अनेक ठिकाणी ३ वाजेपूर्वीच मतदान बंद झाल्याची तक्रारगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान झाले. सरासरी ७० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७२ टक्के मतदान झाले आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात ७० तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी ६८ टक्के मतदान झाले आहे. सरासरी ७० टक्के मतदान झाले.आज मतदानादरम्यान आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या कोरची तालुक्यातील भीमपूर मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड असल्याने १ तास उशीरा मतदान सुरू झाले. तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी तालुक्यातील वायगाव व चंदनखेडी येथे दुपारी १ ते १.३० वाजतादरम्यान ईव्हीएम मशीन बिघाडामुळे बंद झाली. येथे अर्धा ते पाऊन तास मतदान प्रक्रिया खंडीत झाली होती. एटापल्ली तालुक्याच्या अनेक नक्षलप्रभावीत भागात दुपारी १ ते १.३० वाजताच मतदान प्रक्रिया बंद करण्यात आली होती. तर चामोर्शी तालुक्यातील माडे मुधोली व विकासपल्ली या दोन मतदान केंद्रावरही दुपारी १.३० वाजताच मतदान केंद्र बंद केल्याची तक्रार आहे. आलापल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडल्याची माहिती अहेरी पोलिसांनी दिली आहे. ही तुरळक घटना वगळता जिल्हाभर मतदान उत्साह व शांततेत पार पडले. चामोर्शी तालुक्यातील बऱ्याच गावांनी बहिष्काराचा इशारा दिला होता. त्यामुळे या भागात मतदानाची टक्केवारी कमी राहिली. आष्टी परिसरातील इल्लूर मतदान केंद्रावर तसेच चामोर्शी शहरातील १९९ व २०० क्रमांकाच्या जि. प. शाळेच्या मतदान केंद्रावर अत्यल्प मतदान झाले. या भागातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार केल्यामुळे मतदान कमी झाले. गडचिरोली तालुक्यातील कनेरी मतदान केंद्रावरही बहिष्कारामुळे अत्यल्प मतदान झाले. झालेल्या मतदानातही गडचिरोेली विधानसभा मतदार संघात नोटाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याची चर्चा राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांमध्येही आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. यामध्ये मुलचेरा तालुक्यात ७८.७५, सिरोंचा तालुक्यात ७६.५५, भामरागड तालुक्यात ६२.४३, अहेरी तालुक्यात ६८ तर एटापल्ली तालुक्यात ५५ टक्के मतदान झाले, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. तर आरमोरी विधानसभा क्षेत्रात सरासरी ७२ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये आरमोरी तालुक्यात ६९.५८, कोरची तालुक्यात ७३, देसाईगंज तालुक्यात ७२.२०, कुरखेडा तालुक्यात ६१.७३ टक्के मतदान झाले आहे. दुर्गम भागातून अहेरी विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत २८६ मतदान केंद्रांपैकी २२८ मतदान केंद्राच्या पार्ट्या मुख्यालयात पोहोचलेल्या होत्या, अशी माहिती तेथील प्रतिनिधीने दिली आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात वघाळा जुना गावाने मतदानावर १०० टक्के बहिष्कार टाकला. एकाही मतदाराने मतदान केले नाही. महिलांचाही मोठा उत्साह यावेळी मतदानासाठी दिसून आला. मात्र गडचिरोली शहरासह देसाईगंज या नगरपालिका क्षेत्रात मतदानाची टक्केवारी लोकसभा निवडणुकीपेक्षा कमी राहिली. त्यामुळे राजकीय पक्षांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे. यावेळी पहिल्यांदाच अनेक मतदारांजवळ प्रशासनाने दिलेल्या स्लिप असल्याचे दिसून आले. नव मतदारांनीही मोठ्या उत्साहात मतदान केले. लोकसभा निवडणुकीनंतर १६ हजार मतदारांची भर पडली आहे. यातील बहुतांश मतदारांनी आज मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. (जिल्हा प्रतिनिधी)