शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

57 टक्के लाेक अजूनही लसीकरणापासून दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:00 IST

सुरुवातीच्या कालावधीत नागरिकांमध्ये काेराेना लसविषयी गैरसमज असल्याने नागरिक लस घेण्यास धजावत नव्हते. मात्र आराेग्य विभागाने नागरिकांमध्ये जागृती केल्यानंतर हळूहळू नागरिक लसीकरणास पुढे येऊ लागले आहेत. त्यातही शहरी भागातील नागरिकांचेच जास्त प्रमाणात लसीकरण झाले असल्याचे दिसून येत आहे. लसीकरणाच्या तालुकानिहाय आकडेवारीकडे नजर टाकल्यास दुर्गम भागातील नागरिक लस घेण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येत आहे. 

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जास्तीत जास्त नागरिकांचे काेराेना लसीकरण व्हावे यासाठी आराेग्य विभाग व प्रशासन प्रयत्न करीत असला तरी जिल्ह्यातील १८ पेक्षा अधिक वय असलेल्या ४३ टक्केच नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ५७ टक्के लाेकसंख्या अजूनही लसीकरणापासून दूरच असल्याचे दिसून येते. काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे आव्हान आराेग्य विभागासमाेर आहे. सुरुवातीच्या कालावधीत नागरिकांमध्ये काेराेना लसविषयी गैरसमज असल्याने नागरिक लस घेण्यास धजावत नव्हते. मात्र आराेग्य विभागाने नागरिकांमध्ये जागृती केल्यानंतर हळूहळू नागरिक लसीकरणास पुढे येऊ लागले आहेत. त्यातही शहरी भागातील नागरिकांचेच जास्त प्रमाणात लसीकरण झाले असल्याचे दिसून येत आहे. लसीकरणाच्या तालुकानिहाय आकडेवारीकडे नजर टाकल्यास दुर्गम भागातील नागरिक लस घेण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येत आहे. गडचिराेली जिल्ह्यात १८ वर्ष वयाच्या पुढील लाेकसंख्या जवळपास ८ लाखाच्या घरात आहे. १८ वर्षापुढीलच नागरिकांना लस दिली जात असल्याने सध्या लसीकरणाचे उद्दिष्ट हेच मानावे लागेल. ६ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार ६०३ नागरिकांना लस देण्यात आली आहे. १८ वर्ष वयाच्या पुढील लाेकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ४३ टक्के आहे. त्यातही पहिला डाेस २ लाख ७९ हजार ६० नागरिकांनी तर दुसरा डाेस केवळ ६३ हजार ५४३ नागरिकांनी घेतला आहे. 

‘प्राेजेक्ट मुंबई’समाेर लसीकरणाचे आव्हानआजपर्यंत आराेग्य विभागाने लसीकरणाच्या जागृतीसाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्याचा ग्रामीण व शहरी भागात सकारात्मक परिणामही दिसून आला आहे. मात्र दुर्गम व आदिवासीबहूल भागात लसीकरणाचे प्रमाण अजूनही अत्यल्प आहे. लसीकरणाच्या जागृतीची जबाबदारी आता ‘प्राेजेक्ट मुंबई’ या संस्थेने घेतली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी व प्राेजेक्ट मुंबई यांच्यात ५ ऑगस्ट राेजी सामंजस्य करारही झाला. त्यामुळे आतापर्यंत आराेग्य विभागाला जे काम करणे शक्य झाले नाही ते काम प्राेजेक्ट मुंबई ही संस्था कशा पद्धतीने यशस्वी करून दाखविते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष राहणार आहे.  

दुर्गम भागात लसीकरणाचे प्रमाण नगण्य

- एटापल्ली, भामरागड, सिराेंचा, काेरची, धानाेरा हे पाच तालुके आदिवासीबहूल आहेत. या तालुक्यांमध्ये मात्र लसीकरणाचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे दिसून येते. 

- एटापल्ली तालुक्यात केवळ ६ हजार २५७, भामरागड तालुक्यात ५ हजार ५४२, धानाेरा तालुक्यात १४ हजार ६६३, काेरची तालुक्यात केवळ ९ हजार ५७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.- संबंधित तालुक्यांची संख्या लक्षात घेतली तर हे प्रमाण १० टक्केपेक्षाही कमी असल्याचे दिसून येते. यावरून आराेग्य विभागाचे प्रयत्न अयशस्वी झाल्याचे दिसून येते.

- दुर्गम भागातील नागरिकांचे मन वळविण्याचे माेठे आव्हान आराेग्य विभागाला पेलावे लागणार आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या