दोन मृत्यूसह ५७ नवीन कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:45 IST2021-06-09T04:45:06+5:302021-06-09T04:45:06+5:30

जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित २९७२१ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या २८५७७ वर पोहोचली. तसेच सध्या ४१५ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू ...

57 new corona infected with two deaths | दोन मृत्यूसह ५७ नवीन कोरोनाबाधित

दोन मृत्यूसह ५७ नवीन कोरोनाबाधित

जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित २९७२१ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या २८५७७ वर पोहोचली. तसेच सध्या ४१५ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७२१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. मंगळवारला २ नवीन मृत्यूमध्ये ४० वर्षीय पुरुष सोमनपल्ली, ता. सिरोंचा, ४५ वर्षीय पुरुष वैरागड, ता. आरमोरी , यांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१५ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण १.४० टक्के, तर मृत्युदर २.४५ टक्के झाला.

नवीन ५७ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १०, अहेरी तालुक्यातील ४, आरमोरी २, भामरागड तालुक्यातील ५, चामोर्शी तालुक्यातील १५, धानोरा तालुक्यातील २, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये ८, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये ८, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये तीन जणांचा समावेश आहे, तर मंगळवारला कोरोनामुक्त झालेल्या ६४ रुग्णांमध्ये गडचिरोली मधील १३, अहेरी १०, भामरागड १, चामोर्शी १४, धानोरा ३, एटापल्ली ५, मुलचेरा ४, सिरोंचा ३, कोरची १, कुरखेडा ५ तसेच वडसा येथील पाच जणांचा समावेश आहे.

Web Title: 57 new corona infected with two deaths