शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

५३ टक्के बालकांना ‘आधार’

By admin | Updated: July 26, 2015 02:36 IST

शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे आधारकार्ड काढण्याची मोहीम सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली.

३९ केंद्रांवर ४९ किट सुरू : ९ लाख ३७ हजार नागरिकांना मिळाले आधारकार्ड
दिगांबर जवादे गडचिरोली
शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे आधारकार्ड काढण्याची मोहीम सहा महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात या वयाचे जवळपास ७५ हजार बालके असून मागील आठवड्यापर्यंत यापैकी ३९ हजार ६६९ बालकांचे आधारकार्ड काढण्यात आले असून हे काम निर्धारित उद्दिष्टाच्या ५३ टक्के पूर्ण झाले आहे.
प्रत्येक नागरिकाला आधारकार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यानंतर सर्वप्रथम नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात येत होते. नागरिकांचे आधारकार्ड काढण्याचे काम जवळपास ७० ते ८० टक्के पूर्ण झाल्यानंतर शासनाने शून्य ते पाच वयोगटातील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याची मोहीम मागील सहा महिन्यांपासून हाती घेण्यात आली आहे. लहान बालकांनाही शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिल्या जातो. बऱ्याच वेळा काही लाभार्थी एकाच योजनेचा दोन जिल्ह्यातून लाभ घेतात. यामुळे शासनाची फसवणूक होऊन आर्थिक बोजाही सहन करावा लागतो. त्यामुळे शून्य ते पाच वयोगटातीलही बालकांचे आधारकार्ड काढण्यास सुरुवात झाली आहे.
सहा महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ७५ हजार बालके असल्याची नोंद आहे. त्यानंतर या बालकांचे आधारकार्ड काढण्याचे उद्दिष्ट ठेवून आधारकार्ड काढण्यास सुरुवात झाली. मागील आठवड्यापर्यंत सुमारे ३९ हजार ६६९ बालकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत.
गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत भिन्न आहे. त्यामुळे आधारकार्ड काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरीही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आधारकार्ड काढण्याची गती समाधानकारक आहे, असेच म्हणावे लागेल. बहुतांश गावांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तालुकास्थळावर येऊन माहिती पाठवावी लागते. शाळा, अंगणवाडी केंद्र यामध्ये आधारकार्ड काढण्याचे केंद्र उभारले जाते. मात्र अनेक शाळांमध्ये विजेची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे आधारकार्ड काढण्याची यंत्रणा चालविण्यास अडचण निर्माण होते. अनेक नागरिकांना आधारकार्डचे महत्त्व माहीत नाही. त्यांना आधारकार्ड महत्त्व समजावून सांगावे लागते. यासारख्या अनेक अडचणी आहेत. या सर्व अडथळ्यांवर मात करून आधारकार्ड काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या १० लाख ७१ हजार ७९५ एवढी आहे. त्यातील ९ लाख ३७ हजार ४८९ नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ८७.४७ टक्के एवढे आहे.
३९ आधार केंद्र सुरू
आधारकार्ड काढण्यासाठी प्रत्येक तालुकास्थळावर एक याप्रमाणे १२ तालुक्यांमध्ये १२ स्थायी आधारकार्ड केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय २७ केंद्र अस्थायी असून त्यांच्या मार्फतीने ग्रामीण भागात तसेच शहरातील अंगणवाड्यांमध्ये फिरून आधारकार्ड काढण्यात येत आहेत. या एकूण ३९ केंद्रांवर ४९ किट सद्यस्थितीत कार्यरत आहेत. गडचिरोली जिल्ह्याला एकूण ५२ किट प्राप्त झाल्या आहेत. त्यातील दोन किटमध्ये काही तांत्रिक बिघाड आल्याने त्या बंद आहेत. त्या किटही दुरूस्त केल्या जाणार आहेत.
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक कामगिरी
बहुतांश जिल्ह्यांमध्ये ७५ ते ९५ टक्क्यादरम्यान आधारकार्ड काढण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळी आहे. तरीही एकूण नागरिकांच्या ८७.४७ टक्के नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. विकसित समजल्या जाणाऱ्या सोलापूर, परभणी, पुणे या जिल्ह्यांमध्ये अजूनही आधारकार्डचे प्रमाण ८० टक्क्यांच्या खालीच असल्याचे दिसून येते. बालकांचे आधारकार्ड काढण्यासही गती मिळाली आहे.
आधारकार्ड सक्तीचे नसले तरी अत्यावश्यक आहे
आधारकार्ड नाही म्हणून कोणत्याही नागरिकाला शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यामुळे आधारकार्ड सक्तीचे नाही. मात्र आधारकार्ड नसले तर आगाऊचे कागदपत्रे नागरिकाला जोडावी लागतात. बरेच अधिकारी आधारकार्ड नसल्यास योजनेचा लाभ देण्यास विलंब करतात. या सर्व भानगडी टाळण्यासाठी नागरिकाने स्वत:चा आधारकार्ड काढणे आवश्यक आहे. बहुतांश नागरिकांना आधारकार्डचे महत्त्व अजूनही कळले नसल्याने ते आधारकार्ड काढण्यास तयार होत नाही.
भामरागड, एटापल्ली, कोरची, धानोरा या तालुक्यांमध्ये काम करताना थोडी अडचण जाणवत आहे. मात्र याच तालुक्यांमधील गरीब नागरिकांना आधारकार्डची खरी गरज असल्याने तेथील नागरिकांना आधारकार्डचे महत्त्व पटवून देऊन आधारकार्ड काढण्यात येत आहेत. आतापर्यंत ५३ टक्के बालकांचे व ८७ टक्के नागरिकांचे आधारकार्ड निघाले असले तरी १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणा काम करीत आहे.
- सचिन मून, जिल्हा ई-प्रकल्प अधिकारी, गडचिरोली