शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलपीडित कुटुंबातील ५० विद्यार्थ्यांना मिळाली सायकल

By admin | Updated: July 7, 2015 01:18 IST

केवळ पैशाच्या भरवशावर जीवनात यशस्वी होऊन मोठ्या पदावर जाता येत नसून त्यासाठी अफाट कष्ट व जिद्दीची ...

पोलीस अधीक्षकांचे आवाहन : स्वप्न साकारण्यासाठी कष्टाची गरज
गडचिरोली : केवळ पैशाच्या भरवशावर जीवनात यशस्वी होऊन मोठ्या पदावर जाता येत नसून त्यासाठी अफाट कष्ट व जिद्दीची गरज असल्याचे प्रतिपादन गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. आदर्श मित्रमंडळ पुणे, रोटरी क्लब कात्रज, गडचिरोली पोलीस दल व लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहर पोलीस ठाण्यात ‘प्रोजेक्ट भरारी’ अंतर्गत ५० नक्षलपीडित व गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहूल खाडे, ठाणेदार उमेश बेसरकर, विकास राजुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान दुर्गम भागातील ५० विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये ३७ मुलींचा समावेश आहे. यावेळी मार्गदर्शन करताना उदय जगताप म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या अंगात एकतरी कला असते, ती शोधून तिचा वापर चांगल्या कामासाठी करण्याचे कौशल्य विकसित केले पाहिजे. नक्षलपीडित व दुर्गम भागातील विद्यार्थी व युवकांना यापुढेही आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. श्रीनिवास सुंचूवार यांनी मार्गदर्शन करताना, गडचिरोली जिल्ह्यातील युवकांमध्ये बुध्दीमतेची कमतरता नाही. मात्र तिचा विकास करणे गरजेचे आहे. त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याचा विकास करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
प्रास्ताविकादरम्यान एसडीपीओ डॉ. राहूल खाडे यांनी आदर्श मित्र मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करून अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी इतर संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन केले. संचालन जनसंपर्क अधिकारी तेजस्वी पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांना आणखी मदत मिळणार
ज्या विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले आहे. त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती दिसून आल्यास त्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च या संस्थेच्या वतीने उचलण्यात येणार आहे, अशी माहिती उदय जगताप जगताप यांनी दिली.
पुणे येथील स्वयंसेवी संस्थेने राज्याच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलपीडित मुलांसाठी हा उपक्रम राबविला. या उपक्रमापासून इतर स्वयंसेवी संस्थांनी बोध