शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी विधानसभेसाठी २९० केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. या आचारसंहितेचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राजकीय पक्षांची व्होटर स्लिप ही पांढºया रंगाच्या कोºया कागदावर असावी, या स्लिपवर कोणत्याही पक्षाचे चिन्ह, उमेदवाराचे नाव, वॉटर मार्क नसावे, वोटर स्लिप प्रिंडेट किंवा झेरॉक्स असू शकते.

ठळक मुद्देनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती : खर्चाची मर्यादा २८ लाख रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्रात २९० मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. या मतदान विधानसभा क्षेत्रात एकूण २ लाख ३६ हजार २८६ मतदार आहेत, अशी माहिती अहेरीचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी मनिष लोणारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. या आचारसंहितेचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राजकीय पक्षांची व्होटर स्लिप ही पांढºया रंगाच्या कोºया कागदावर असावी, या स्लिपवर कोणत्याही पक्षाचे चिन्ह, उमेदवाराचे नाव, वॉटर मार्क नसावे, वोटर स्लिप प्रिंडेट किंवा झेरॉक्स असू शकते. मतदार ओळखपत्र असणे म्हणजे मतदाराला मतदानाचा अधिकार प्राप्त होत नाही. तर त्यासाठी मतदार यादीत त्या मतदाराचे नाव असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव असेल तर निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या ११ पैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर केल्यास मतदान करण्याची परवानगी दिली जाईल. मतदान केंद्रांवर पाणी, वीज, रॅम्प उपलब्ध राहतील. प्रत्येक केंद्रावर बीएलओ राहतील. मतदानापूर्वी मॉकपोल घेण्यात येईल.निवडणूक आचारसंहितेचा भंग होत असल्यास सी-व्हीजील अ‍ॅप, वोटर हेल्पलाईन अ‍ॅप, पीडब्ल्यूडी अ‍ॅप, कॅन्डीडेट सुविधा अ‍ॅप, एनजीएसपी, वोटर टीमोट अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत.खर्चासाठी उमेदवाराकडे स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक आहे. खर्चाची मर्यादा २८ लाख रुपये देण्यात आली आहे. उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केल्यापासून खर्चाचा हिशोब दुपारी २ वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. अंतिम हिशोब उमेदवार निवडून आल्यानंतर ३० दिवसांत दाखल करणे बंधनकारक राहील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीष लोणारकर यांनी दिली.दुपारपर्यंत स्वीकारणार निमनिर्देशन पत्र२७ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत कार्यालयीन दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील. २८ तारखेला चौथा शनिवार, २९ ला रविवार असल्याने या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाहीत. ५ आॅक्टोबर रोेजी उमेदवारी अर्जाची छाननी होईल. ७ आॅक्टोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिनांक असेल. २१ आॅक्टोबर रोजी मतदान होईल. मतदानाच्या दिवसाच्या ४८ तासांच्या अगोदर प्रचार बंद करण्यात येईल.नवीन अधिकाºयासाठी आव्हानात्मक कामविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अहेरीचे उपविभागीय अधिकारी म्हणून मनिष लोणारकर दोन दिवसांपूर्वी रुजू झाले. गडचिरोली जिल्ह्यात हा उपविभाग आणि अहेरी मतदार संघ नक्षलदृष्ट्या सर्वाधिक संवेदनशिल भाग आहे. या मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळताना लोणारकर यांना पोलीस विभागाशी समन्वय ठेवत ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत या उपविभागात नक्षल्यांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळे आणले तरी या भागात सर्वाधिक मतदान झाले होते हे विशेष.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019