शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

४८० नागरिकांची आरोग्य तपासणी

By admin | Updated: March 9, 2017 01:35 IST

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नगर परिषद व जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या संयुक्त

पालिकेतर्फे आरोग्य शिबिर : विविध स्पर्धेतून महिलांनी दाखविले आपले कलाकौशल्य गडचिरोली : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नगर परिषद व जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त गोकुलनगर येथील सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळेच्या प्रांगणात बुधवारी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात महिला, पुरूष, बालके व वृद्ध मिळून एकूण ४८० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगीता पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून न. प. उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर उपस्थित होते. यावेळी मंचावर पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने, नगरसेवक प्रमोद पिपरे, संजय मेश्राम, सतीश विधाते, मुक्तेश्वर काटवे, प्रमोद पिपरे, रंजना गेडाम, रितू कोलते, निमा उंदीरवाडे, वर्षा बट्टे, भूपेश कुळमेथे, प्रवीण वाघरे, रमेश भुरसे, लता लाटकर, वर्षा नैताम, मंजूषा आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नागरिकांची सिकलसेल, एचआयव्ही, ब्लडप्रेशर, मधुमेह, नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच नाक, कान, घसा व एचआयव्हीचे तपासणी कक्ष लावण्यात आले होते. शिबिरस्थळी गोकुलनगर, फुलेवॉर्ड, आशीर्वाद नगर व इतर वॉर्डातील नागरिकांनी तपासणीसाठी गर्दी केली होती. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना औषध पुरवठा करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष योगीता पिपरे, मुख्याधिकारी निपाने, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, सभापती अल्का पोहणकर आदींनी महिलांचे आरोग्य, स्वावलंबन व सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. संचालन गणेश ठाकूर, प्रास्ताविक कानडे यांनी केले आभार विद्युत पर्यवेक्षक घोसे यांनी मानले. यशस्वीतेसाठी पाणी पुरवठा अभियंता उमेश शेंडे, आरोग्य कर्मचारी प्रणाली दुधबळे, दिलीप संतोषवार, छगन काळबांधे, विशाल गजभिये, गणेश नाईक आदींनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)