४२५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

By Admin | Updated: May 2, 2015 01:32 IST2015-05-02T01:32:33+5:302015-05-02T01:32:33+5:30

संत निरंकारी चॅरिटेबल फॉऊंडेशन देसाईगंजच्या वतीने शुक्रवारी येथील संत निरंकारी सत्संग भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

425 blood donors made blood donation | ४२५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

४२५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

देसाईगंज : संत निरंकारी चॅरिटेबल फॉऊंडेशन देसाईगंजच्या वतीने शुक्रवारी येथील संत निरंकारी सत्संग भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ४२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी साई बसनशहा मंदिराचे साई दिलीपकुमार, आ. क्रिष्णा गजबे, भाजपाचे संघटनमंत्री रवी भुसारी, स्टेट बँक शाखा देसाईगंजचे व्यवस्थापक तुर्के, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील आदी उपस्थित होते. अनेकदा रक्तदान करणाऱ्या माजी जि.प. बांधकाम सभापती रमाकांत ठेंगरी, जमाल शेख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, विधान परिषदसदस्य अनिल सोले, भाजपाचे पूर्व विदर्भ प्रमुख उपेंद्र कोठेकर, सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, उपविभागीय अधिकारी सुनिल लाडे, तहसीलदार अजय चरडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, तालुकाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, पूर्व संघटनमंत्री आशिष वांदिले यांनी शिबिराला भेट दिली. संत निरंकारी चॅरिटेबल फॉऊंडेशनच्या वतीने होणाऱ्या रक्तदान शिबिरात अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 425 blood donors made blood donation