एका मृत्यूसह ३९ नवीन कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST2021-03-25T04:35:24+5:302021-03-25T04:35:24+5:30

जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १०२७२ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ९८०४ वर पोहचली. तसेच सद्या ३६० क्रियाशील कोरोना बाधितांवर उपचार सुरू ...

39 new corona infected with one death | एका मृत्यूसह ३९ नवीन कोरोना बाधित

एका मृत्यूसह ३९ नवीन कोरोना बाधित

जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १०२७२ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ९८०४ वर पोहचली. तसेच सद्या ३६० क्रियाशील कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण १०९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. बुधवारी एका मृत्युमध्ये ६२ वर्षीय महिला असून ती इतर जिल्ह्यातील होती. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४४ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ३.४९ टक्के तर मृत्यू दर१.०६ टक्के झाला.

नवीन ३९ बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील १६ जणाचा समावेश असून अहेरी तालुक्यातील १०, आरमोरी तालुक्यातील ८, चामोर्शी तालुक्यातील २, कुरखेडा तालुक्यातील १, मुलचेरा तालुक्यातील १, वडसा तालुक्यातील १,जणाचा समावेश आहे. तर बुधवारी कोरोनामुक्त झालेल्या २० रूग्णांमध्ये गडचिरोली मधील १९, चामोर्शी तालुक्यातील १ जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील कारमेल शाळा १, नवेगाव २ ,रेड्डी गोडावून १, बालाजी नगर १,कन्नमवार वार्ड १,कारमेल शाळाचे मागे १,स्थानिक १, विसापूर १,विश्राम भवन १,आशिर्वाद नगर २,आंनद नगर १,पंचायत समिती २, रामनगर १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये नागेपल्ली ३, स्थानिक २, आलापल्ली २, फारेस्ट कॉलनी २, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये तहसिल कार्यालय जवळ १, ताडुलवार नगर ३, इंदिरा नगर १, स्थानिक १, जिल्हा परिषद शाळा पिसेवाडा १, भगतसिंग चौक १, चामोर्शी तालुक्यातील कोनसरी २, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, मूलचेरा तालुक्यातील रविंद्रनाथ टागोर शाळेजवळ १, वडसा तालुक्यातील हनुमान वार्ड एकाचा समावेश आहे.

Web Title: 39 new corona infected with one death