शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी आगारात ३८ वाहकांचा तुटवडा

By admin | Updated: October 8, 2014 23:25 IST

सर्वसामान्य नागरिकांसाठी बस वाहतूक सेवा सोयीची असल्यामुळे अनेक नागरिक बससेवेचा आधार घेतात. मात्र पुरेशा चालक-वाहकाअभावी सध्या महामंडळाच्या अहेरी आगाराच्या बस वाहतुकीवर

ए. आर. खान - अहेरीसर्वसामान्य नागरिकांसाठी बस वाहतूक सेवा सोयीची असल्यामुळे अनेक नागरिक बससेवेचा आधार घेतात. मात्र पुरेशा चालक-वाहकाअभावी सध्या महामंडळाच्या अहेरी आगाराच्या बस वाहतुकीवर परिणाम होत आहे. अहेरी आगारात १५५ चालक व तेवढेच वाहक होते. २०१३-१४ या वर्षात अहेरी आगारातील १२९ बस वाहकांपैकी ७ वाहक निलंबित झाले. तर ५ वाहकांनी राजीनामे दिले. त्यामुळे आता ११७ वाहकांच्या भरवशावरच अहेरी आगाराच्या वाहतुकीचा डोलारा आहे. सध्य:स्थितीत महामंडळाच्या अहेरी आगारात ३८ वाहकांचा तुटवडा असल्याची माहिती पुढे आली आहे. एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी व मुलचेरा आदी तालुक्यातील प्रवाशांच्या वाहतुकीची जबाबदारी अहेरी आगारावर आहे. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील तसेच लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांची जबाबदारी या आगारावर आहे. या आगारामार्फत सध्य:स्थितीत बसवाहतुकीचे ७६ शेड्यूल सोडल्या जातात. या आगारातून एकूण २८५ बसफेऱ्या सध्य:स्थितीत धावत आहेत. अहेरी आगारात सध्य:स्थितीत असलेल्या ७५ बसगाड्यांमध्ये ७३ बसेस जलद व अतिलांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या आहेत. मानव विकास मिशनच्या २९ स्कूल बसगाड्या व ३ निमआराम अतिजलद बसगाड्या आहेत. या आगारातील सर्व बसफेऱ्या चालविण्यासाठी वाहकांची कमतरता भासत आहे. त्यातल्या त्यात अर्ध्याअधिक बसगाड्यांची अवस्था बिकट आहे. आगार व्यवस्थापकाच्या गलथान कारभारामुळे अनेक बसेस प्रवासी वाहतुकीसाठी योग्य नाहीत. आगार व्यवस्थापकाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या उशीरा पोहोचतात. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अहेरी आगारात करण्यात आलेल्या नवीन बसेसचा पुरवठा अत्यंत नगण्य आहे. याचा सर्वाधिक फटका राज्य, आंतरराज्य मार्गावरील तसेच अतिदुर्गम भागातील प्रवाशांना बसत आहे. एकेकाळी महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या अहेरी आगाराची वाटचाल शेवटच्या क्रमांकावर सुरू आहे. या आगाराच्या व्यवस्थेकडे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.