शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शीतील ३४१ कुटुंबांना घरकुलांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 05:00 IST

ग्रामपंचायतीच्या काळात प्रभाग क्रमांक ६ व ८ मधील कुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले. नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर आखिव पत्रिकेची शासकीय अटीनुसार घरकुलासाठी आखीव पत्रिका आवश्यक आहे. मात्र चामोर्शी शहराचा सीटी सर्वे न झाल्याने सदर ३४१ कुटुंबांना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे. प्लाटची आखिव पत्रिका मिळण्यासाठी झोपडीत वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबांना प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहे.

ठळक मुद्देपट्टे व आखिव पत्रिका केव्हा मिळणार?; आबादी जागेवरील प्लॉटधारकांचा संघर्ष कायमच

रत्नाकर बोमीडवार ।लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : ४० वर्षापूर्वी चामोर्शी शहरातील ३४१ कुटुंबांना प्रशासनाने आबादी जागेवर प्लाट दिले. परंतु आखीव पत्रिका व पट्टे न मिळाल्याने सदर गरीब कुटुंब घरकूल योजनेपासून वंचित आहेत.चामोर्शी शहरातील सर्वे नंबर १०९९, ११००, १००१, ११०४/१, आराजी ४.८६ हेक्टर आर पैकी काही शासकीय जागेवर प्रशासनाने ४० वर्षापूर्वी प्रभाग क्रमांक ६, ८ व १५ मधील १४१ व याच सर्वे नंबर मधील बाजाराच्या जागेवर वास्तव्य असलेल्या २०० कुटुंबाना हटवून प्रभाग क्रमांक १५ मध्ये प्लाट दिले. प्लाट मिळालेल्या या ३४१ कुटुंबांना घरटॅक्स पावती व नमुना ८ देण्यात आला आहे. तत्कालीन ग्रामपंचायतीच्या काळात प्रभाग क्रमांक ६ व ८ मधील कुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले. नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर आखिव पत्रिकेची शासकीय अटीनुसार घरकुलासाठी आखीव पत्रिका आवश्यक आहे. मात्र चामोर्शी शहराचा सीटी सर्वे न झाल्याने सदर ३४१ कुटुंबांना घरकुलापासून वंचित राहावे लागत आहे. प्लाटची आखिव पत्रिका मिळण्यासाठी झोपडीत वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबांना प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहे.आखिव पत्रिका, सातबारा व जमिनीचा पट्टा न मिळाल्याने ३४१ कुटुंबांना घरकुलाअभावी झोपडीत राहावे लागत आहे. सदर कुटुंबांना पट्टे मिळावे, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष माणिकचंद कोहळे व इतरांनी २५ जुलै २०१९ व ६ जानेवारी २०२० जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा व तालुका भूमिअभिलेख, नगर पंचायतीला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी भूमिअभिलेख कार्यालय, तहसीलदार यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र कार्यवाही करण्यासाठी विलंब होत आहे. गडचिरोली वगळता इतर जिल्ह्यात आखीव पत्रिका देणे सुरू आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, नगर पंचायत प्रशासन व तालुका प्रशासनाने ठोस पावले उचलून त्या कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.घरकुलासाठी लागणारे दस्तावेज ज्यांच्याजवळ आहे, अशा कुटुंबांचे प्रस्स्ताव स्वीकारल्या जात आहे. ज्यांच्याजवळ कागदपत्र नाही त्यांना संधी देत असून भूमिअभिलेख कार्यालयाशी सिटी सर्वे मोजणीबाबत चर्चा सुरू आहे.- सतिश चौधरी, मुख्याधिकारी,नगर पंचायत चामोर्शीआवास योजनेसाठी आवश्यक दस्तावेजप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी अर्जासोबत विविध दस्तावेज आवश्यक आहेत. यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, नमुना ८-अ, आखीव पत्रिका, रजिस्ट्री, ७/१२, जमिनीचा पट्टा, बँक पासबूक, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला (तहसीलदारांचा), कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड, मागील तीन वर्षाची घर टॅक्स पावती आदींचा समावेश आहे. सदर दस्तावेज असलेल्यांना घरकूल मंजूर केले जाते.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना