शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

३० पासून बेमुदत उपोषण

By admin | Updated: March 20, 2015 01:24 IST

पेसा अधिसूचनेची जिल्ह्यात अंमलबजावणी केल्याने येथील गैर आदिवासींवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

गडचिरोली : पेसा अधिसूचनेची जिल्ह्यात अंमलबजावणी केल्याने येथील गैर आदिवासींवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेसा अधिसूचना रद्द करून सध्या सुरू असलेल्या पदभरतीला स्थगिती द्यावी अन्यथा ३० मार्च पासून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनातून पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, जिल्ह्यात एकुण लोकसंख्येच्या ६० टक्के जनता गैर आदिवासी आहे. तरीही ९ जून २०१४ रोजी तत्कालीन राज्यपालांनी अधिसूचना काढून जिल्ह्यातील गावांमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्याचा निर्णय घेतला. यामध्ये तलाठी, सर्वेक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, कृषी सहाय्यक, पशु सहाय्यक, परिचारिका, वनरक्षक व कोतवाल आदी पदांचा समावेश आहे. त्यामुळे सदर पद भरतीत गैर आदिवासींना स्थान मिळणार नाही. सर्वसाधारण पद भरतीत इतर मागास वर्गीयांना ६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पद भरतीत गैर आदिवासींवर अन्याय होत आहे, असे म्हटले आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी आव्हाड यांच्याशी चर्चा करून गैर आदिवासींच्या समस्या मांडल्या व पेसा अधिसूचना त्वरित रद्द करण्यासंबंधीचे निवेदन दिले. यावेळी जि. प. सभापती विश्वास भोवते, जि. प. सदस्य प्रशांत वाघरे, जगन्नाथ बोरकुटे, विनोद दशमुखे, सुनील वडेट्टीवार, विजय समर्थ, रवीकिरण समर्थ, राम लांजेवार, पंकज खरवडे, रामहरी उगले, महेंद्र शेंडे, मोहित धकाते, दिगांबर मानकर, जमाल सय्यद, उल्हास देशमुख, किशोर गद्देवार, संतोष बोलुवार, भाष्कर बुरे, विलास गावंडे उपस्थित होते.