शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

अंगारातील २७ वीज खांब जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST

४० वर्षांपूर्वी अंगारा गावात लावलेल्या लोखंडी वीज खांबांपैकी सुमारे २७ खांब जीर्ण झाले आहेत. सदर खांब कोसळून कधीही जीवितहानी होण्याचा धोका असल्याने सदर खांब महावितरणने बदलवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देदुर्घटनेची शक्यता : ४० वर्षांपूर्वी गावात लावले होते खांब; गावकऱ्यांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : ४० वर्षांपूर्वी अंगारा गावात लावलेल्या लोखंडी वीज खांबांपैकी सुमारे २७ खांब जीर्ण झाले आहेत. सदर खांब कोसळून कधीही जीवितहानी होण्याचा धोका असल्याने सदर खांब महावितरणने बदलवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.तालुका समन्वय पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चांगदेव फाये, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी गावातील वीज खांबांची तपासणी केली असता, सुमारे २७ वीज खांब जीर्ण झाले असल्याचे दिसून आले आहे. सदर वीज खांब खालच्या बाजूस गंजले आहेत. खांबाच्या मधला भाग गंजून नष्ट झाला आहे. केवळ दोन बाजू शिल्लक असून त्यावर खांब उभा आहे. सदर खांब गावात आहे. वादळवाºयामुळे यातील काही खांब कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीर्ण झालेले वीज खांब बदलवावे, यासाठी गावकरी व ग्रामपंचायतींनी महावितरणला अनेकवेळा निवेदन सादर केले. मात्र जीर्ण खांब बदलविण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही.अंगारा हे कुरखेडा तालुक्यातील मोठे गाव आहे. या गावात जवळपास १ हजार कुटुंब आहेत. प्रत्येक घरी वीज जोडणी आहे. विद्युत बिलाच्या माध्यमातून महावितरणला महिन्याचा लाखो रुपयांचा महसूल प्राप्त होते. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी चांगदेव फाये यांच्यासह भाजप जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, डॉ.मनोहर आत्राम, सुलक्षण नंदनवार, देवदत्त हाडगे, दादाजी सुकारे, देवराव उईके, दिगांबर बाळबुद्धे, किसन लांजेवार, भजन कापगते, भूपेंद्र गहाणे, महिपाल कुमरे यांच्यासह अंगारातील नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :electricityवीज