२९१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 06:00 AM2020-02-26T06:00:00+5:302020-02-26T06:00:22+5:30

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी सोमवारी राज्यभरातील जूनपर्यंत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे सोमवारपासून संपूर्ण जिल्हाभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी सांगितले.

291 Gram Panchayat elections spoiled | २९१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगूल

२९१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगूल

googlenewsNext
ठळक मुद्दे२५६९ सदस्यांची होणार निवड : एप्रिल ते जूनदरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रा.पं.मध्ये आचारसंहिता

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील ४५७ ग्रामपंचायतींपैकी २९१, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २५६९ ग्रामपंचायत सदस्य आणि २९१ सरपंचांची निवड करण्यासाठी येत्या २९ मार्च रोजी मतदान होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी सोमवारी राज्यभरातील जूनपर्यंत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे सोमवारपासून संपूर्ण जिल्हाभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी सांगितले. ३० मार्च रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ही आचारसंहिता शिथिल होणार आहे.
निवडणूक होणार असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक ७५ ग्रामपंचायती चामोर्शी तालुक्यातील, ६१ ग्रामपंचायती धानोरा तालुक्यातील तर ५१ ग्रामपंचायती गडचिरोली तालुक्यातील आहेत. त्यातून अनुक्रमे ५४१, २७८ आणि ३१७ सदस्यांची निवड केली जाणार आहे. भामरागड तालुक्यात एकाही ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होणार नाही.
विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सदस्य आणि सरपंचांच्या जागा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. परंतू जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातच उतरत नाहीत. दुर्गम भागात नक्षलवाद्यांच्या दबावामुळे निवडणूक लढण्यास कोणी तयार नसते. यावेळी या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवारांना उभे करून रिक्त असलेल्या आणि होणाऱ्या जागा भरण्यात प्रशासनाला किती यश येते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २७ फेब्रुवारी रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. दि.६ ते १३ मार्च यादरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. दि.१६ ला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. दि.१८ ला दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन मागे घेता येणार आहे. त्यांतर रिंगणात कायम असलेल्या सदस्यांसाठी दि.२९ मार्च रोजी मतदान होईल. दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि.३० ला मतमोजणी होणार आहे.

यावेळी इच्छुकांची संख्या वाढणार?
जातीच्या प्रमाणपत्रांअभावी अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहात होते. मात्र गेल्या दोन वर्षात जिल्हा प्रशासनाने अनेक ठिकाणी शिबिरे घेऊन जात प्रमाणपत्रांचे वाटप केले. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: 291 Gram Panchayat elections spoiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.