शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

290 ग्रामपंचायतींचे दस्तावेज ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 05:00 IST

नागरिकाचा सर्वांत पहिला संबंध आपल्या ग्रामपंचायतीशी येतो. अनेक याेजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच महत्त्वाचे दाखले काढण्यासाठी ग्रामपंचायतींच्या दाखल्यांची गरज पडते. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून वेळाेवेळी दाखले मागितले जातात. मागणी केल्याबराेबर दाखले मिळावे, यासाठी दाखल्यांचे संगणकीकरण  करण्याबराेबरच सदर दाखले ऑनलाईन करण्याचा उपक्रम राज्य शासनाने सुरू केला आहे. नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले सुमारे ३३ नमुने ऑनलाईन केले जात आहेत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : ग्रामपंचायतींचा कारभार हायटेक करताना शासनाने ग्रामपंचायतीचे १ ते ३३ नमुने ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील २९० ग्रामपंचायतींचे दस्तावेज ऑनलाईन करण्यात आले आहेत. इतर ग्रामपंचायतीमध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे काम पूर्ण झाले नाही. भारत हा खेड्यांचा देश आहे. त्यामुळे जाेपर्यंत ग्रामीण भागाचा विकास हाेणार नाही, ताेपर्यंत देशाचा विकास हाेणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेऊन गावांचा विकास करण्याकडे केंद्र व राज्य शासन विशेष लक्ष देत आहे. काही निधी थेट ग्रामपंचायतींना पाठविला जात आहे. नागरिकाचा सर्वांत पहिला संबंध आपल्या ग्रामपंचायतीशी येतो. अनेक याेजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच महत्त्वाचे दाखले काढण्यासाठी ग्रामपंचायतींच्या दाखल्यांची गरज पडते. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून वेळाेवेळी दाखले मागितले जातात. मागणी केल्याबराेबर दाखले मिळावे, यासाठी दाखल्यांचे संगणकीकरण  करण्याबराेबरच सदर दाखले ऑनलाईन करण्याचा उपक्रम राज्य शासनाने सुरू केला आहे. नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले सुमारे ३३ नमुने ऑनलाईन केले जात आहेत. गडचिराेली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा पाेहाेचली नाही. अशाही परिस्थितीत स्थानिक पातळीवरील केंद्र संचालकांनी दाखले ऑनलाईन केले आहेत. 

तत्काळ मिळतो दाखलादाखले ऑनलाईन करण्याचे महत्त्वपूर्ण काम ग्रामपंचायतींमधील संगणक ऑपरेटरने केले आहे. स्थानिक स्तरावरीलच संगणक ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेवर दाखले उपलब्ध हाेत आहेत. तसेच दाखला ऑनलाईन असल्याने शाेधाशाेध करण्याची गरज नाही किंवा त्यात बदल करणेही शक्य नाही. 

भामरागड व धानाेरा तालुका सर्वांत मागे-    जिल्ह्यातील ४५८ ग्रामपंचायतींपैकी २९० ग्रामपंचायतींचे सर्व दाखले ऑनलाईन झाले आहेत. भामरागड व धानाेरा तालुका या कामात सर्वांत मागे आहे. भामरागड तालुक्यातील तीन, तर धानाेरा तालुक्यातील केवळ सात ग्रामपंचायतींचे काम पूर्ण झाले आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत हे प्रमाण अतिशय कमी आहे. -    धानाेरा तालुक्याचा काही भागात इंटरनेट सेवा उपलब्ध आहे, तरीही काम अतिशय मंदगतीने सुरू असल्याचे दिसून येते. 

हे आहेत ग्रामपंचायतीमधील १ ते ३३ नमुनेग्रामपंचायत नमुना १ म्हणजेच अंदाजपत्रक, नमुना २ म्हणजेच पुनर्नियाेजित नियत वाटप, नमुना ३ ग्रामपंचायत जमा-खर्चाचे विवरण, नमुना ४ ग्रामपंचायत मत्ता व दायित्व, नमुना ५ दैनिक राेकडवही, नमुना ६ मासिक जमा खर्चाची नाेंदवही, नमुना ७ सामान्य पावती, नमुना ८ कर आकारणी नाेंदवही, नमुना ९ कर मागणी नाेंदवही, नमुना १० कर व फी वसुलीबाबत पावती, नमुना ११ किरकाेळ मागणी नाेंदवही आदींचा समावेश आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत