२२ शेततळ्यांचे काम पूर्ण

By Admin | Updated: August 26, 2016 01:12 IST2016-08-26T01:12:01+5:302016-08-26T01:12:01+5:30

मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत तालुक्यातील बंदूकपल्ली येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या

22 Farmers' work is completed | २२ शेततळ्यांचे काम पूर्ण

२२ शेततळ्यांचे काम पूर्ण

मुलचेरा तालुका : तालुक्यात २८८ अर्ज प्राप्त;बंदूकपल्ली आघाडीवर
मुलचेरा : मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत तालुक्यातील बंदूकपल्ली येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने एकूण २२ शेततळ्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तत्पूर्वी तालुक्यात एकूण २८८ अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी अनेकांनी शेतकऱ्यांचे काम पूर्ण केले. नागपूर विभागात या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक कामे झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
गेल्या दोन वर्षातील पाणी टंचाई तसेच दुष्काळ लक्षात घेता यावर्षी शेततळ्याच्या रूपाने पाणीसाठा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना या जलसाठ्याचा फायदा नक्कीच होणार आहे. योजनेंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून शेतकरी धानासह तूर, मका, भाजीपाला पिकाचे उत्पादन घेऊ शकणार आहेत. तालुक्यातील इतर शेततळ्याची कामे २०१६-१७ या सत्रात पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील जलसाठा वाढून खरीप व रबी हंगामातील पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. मागेल त्याला शेततळे अंतर्गत लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी पाटील, मंडळ कृषी अधिकारी सुतार, कृषी पर्यवेक्षक प्रकाश पराते, कृषी सहायक खेडकर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 22 Farmers' work is completed