शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

१.८९ लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: September 27, 2014 23:14 IST

एकलपूर मार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी पाठलाग करून शहरातील सिंधू भवनाजवळ गुटखा व सुगंधित तंबाखू घेऊन जाणारे वाहन पकडल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

आरोपीला अटक : पोलिसांनी वाहन पकडलेदेसाईगंज : एकलपूर मार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी पाठलाग करून शहरातील सिंधू भवनाजवळ गुटखा व सुगंधित तंबाखू घेऊन जाणारे वाहन पकडल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. या वाहनातून पोलिसांनी १ लाख ८९ हजार २०० रूपये किमतीचे ९ पेट्या सुगंधित तंबाखू जप्त केला. आरोपी जितेंद्र राजकुमार टहलानी (२७) रा. सिंधू कॉलनी देसाईगंज याला पोलिसांनी अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा मार्गावरून वाहनाने मोठ्या प्रमाणात गुटख्याची आयात शहरात होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुरखेडा-एकलपूर मार्गावर रात्रीच्या सुमारास नाकाबंदी केली. दरम्यान, रात्री ९.३० वाजताच्या सुमारास एमएच-३४-एए-५६४१ हे वाहन गुटखा घेऊन शहरात येत होते. दरम्यान, पोलिसांनी वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने वाहन चालवून पसार होण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा संशय अधिक बळावल्यानंतर पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग केला. सिंधू भवनासमोर वाहनाला पकडले. या वाहनाची तपासणी केली असता, या वाहनात ९ पेट्या सुगंधित तंबाखू आढळून आला. पोलिसांनी या वाहनातील १ लाख ८९ हजार २०० रूपये किमतीचा ९ पेट्या सुगंधित तंबाखू जप्त केला. या प्रकरणातील आरोपी जितेंद्र राजकुमार टहलानी (२७) याचेवर भादंविचे कलम २७३, १८८, सहकलम २६ (२)/(४), ३०(२-अ) तसेच अन्न व सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक यमगर यांनी केली. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करून पोलिसांनी काल रात्री आरोपीला अटक केली. मात्र शनिवारी ठाण्यातूनच आरोपीची जमानत करण्यात आली. (वार्ताहर)