शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर दाखल करण्यास १५ पर्यंत मुदत

By admin | Updated: June 27, 2015 02:09 IST

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांना अपात्र ठरविण्याच्या याचिकेवर ...

उच्च न्यायालयात याचिका : होळी अपात्रता प्रकरण गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांना अपात्र ठरविण्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वादी आणि प्रतिवादींना त्यांचे मुद्दे सादर करण्यासाठी १५ जुलै ही तारीख दिली आहे.१५ आॅक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून डॉ. देवराव होळी हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. परंतु डॉ. होळी हे वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत होते आणि विजयी होण्याच्या क्षणापर्यंत त्यांचा राजीनामा शासनाने मंजूर केला नव्हता. तसेच डॉ. आ. होळी हे शासकीय सेवेत असताना शकुंतला मेमोरियल सोसायटीचे अध्यक्षही होते. या संस्थेने एनआरएचएम योजनेंतर्गत सिकलसेल कार्यक्रम राबविला होता. यासंबंधीची सुमारे ८ लाख ६८ हजार ३६३ रुपयांची रिकव्हरी या संस्थेकडे आहे. (अलीकडेच गडचिरोली न्यायालयाने आ.डॉ. होळी यांना शकुंतला मेमोरियल सोसायटीच्या खटल्यातून दोषमुक्त केले आहे) या दोन प्रमुख मुद्द्यावर डॉ.देवराव होळी यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, अशा आशयाची याचिका डॉ.होळी यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अ‍ॅड.नारायण जांभुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने आ.डॉ.होळी यांना उत्तर सादर करण्यासाठी २६ जून ही अंतिम तारीख दिली होती. त्यानुसार आ.डॉ.होळी यांच्या वकिलांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात उत्तर सादर केले. यावेळी न्यायालयाने वादी आणि प्रतिवादींना त्यांचे मुद्दे मांडण्यासाठी १५ जुलै ही तारीख दिली आहे. या खटल्यामध्ये एकूण १६ प्रतिवादी होते.मात्र उच्च न्यायालयाने अन्य १५ प्रतिवादींना खटल्यातून वगळले असून, आता केवळ आ. डॉ. होळी हे एकमेव प्रतिवादी उरले आहेत, हे येथे उल्लेखनीय. आ.डॉ.होळी यांच्यातर्फे अ‍ॅड.खानझोडे, तर याचिकाकर्ते अ‍ॅड.नारायण जांभूळे यांच्यातर्फे अ‍ॅड. प्रदीप वाटोळे काम पाहत आहेत.