शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

१४ हजार ६०० अर्ज प्रलंबित

By admin | Updated: January 31, 2016 01:18 IST

राज्य शासनाच्या वतीने भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महाविद्यालयस्तरावर : जिल्हयात यंदा भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेची प्रक्रिया मंदावली दिलीप दहेलकर गडचिरोलीराज्य शासनाच्या वतीने भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र दुर्गम भागात इंटरनेटचा अभाव, कनेक्टिव्हीटीची समस्या, समाजकल्याण विभागाच्या वेबसाईटमध्ये वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया प्रचंड मंदावली. महाविद्यालयस्तरावरूनही शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज व हार्डकॉपी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात अद्यापही सादर करण्यात आले नाही. विशेष म्हणजे सन २०१५-१६ या चालू वर्षात जिल्हाभरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन एकूण १४ हजार ६०० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज भरले. मात्र यापैकी एकही अर्ज समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाला प्राप्त झाले नाही. हे सारेच अर्ज महाविद्यालयास्तरावर प्रलंबित असल्याने शिष्यवृत्ती मंजुरीसाठी प्रचंड विलंब होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. सन २०१५-१६ या चालू सत्रात गडचिरोली जिल्ह्यात सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय मिळून एस.सी., ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी या प्रवर्गातील मागासवर्गीय प्रवेशित विद्यार्थ्यांची एकूण संख्या जवळपास १८ हजार ५०० आहे. यापैकी यंदा १४ हजार ६०० विद्यार्थ्यांनी समाजकल्याणच्या वेबसाईडवर शिष्यवृत्तीकरिता आॅनलाईन नोंदणी केली. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी सदर अर्जाची हार्डकॉपी महाविद्यालयाकडे सादर करावयाची होती. सदर हार्डकॉपी व कागदपत्रांची तपासणी करून महाविद्यालय प्रशासनाने जिल्हास्तरावर असलेल्या समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात सादर करावयाचे होते. तसेच सदर अर्ज महाविद्यालयाने समाजकल्याण विभागाकडे आॅनलाईन करणे आवश्यक होते. त्यानंतर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची हार्डकॉपी व जुन्या विद्यार्थ्यांचे बी स्टेटमेंट जिल्ह्याच्या समाजकल्याण विभागाकडे सादर करणे गरजेचे होते. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीची अशी पद्धत आहे. मात्र शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीत महाविद्यालयस्तरावर प्रचंड दिरंगाई होत असल्याने शिष्यवृत्ती मंजूर करण्यास विलंब होणार आहे. राज्याच्या समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्यासाठी दोनदा मुदतवाढ दिली आहे. महाविद्यालयाचे सत्र सुरू झाल्यानंतर आॅगस्ट महिन्यापासून शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र पाच महिन्यांचा कालावधी उलटूनही शिष्यवृत्ती योजनेची अर्धीही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने शिष्यवृत्ती योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.