FIFA World Cup 2018: ‘या’ भारतीय चिमुकल्याला मिळाला फिफा विश्वचषकात मान!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 05:03 PM2018-06-20T17:03:36+5:302018-06-20T17:03:36+5:30

बंगळूरु येथील दहा वर्षीय ऋषि तेज हा तो चिमुकला आहे. सोमवारी रशियातील सोची येथे बेल्जियम आणि पनामा यांच्यातील सामन्यावेळी ऋषी मैदानात मोठ्या तामझामासह मैदानात आला होता. 

FIFA World Cup 2018: 'This Indian child got chance as ball boy in FIFA World Cup! | FIFA World Cup 2018: ‘या’ भारतीय चिमुकल्याला मिळाला फिफा विश्वचषकात मान!

FIFA World Cup 2018: ‘या’ भारतीय चिमुकल्याला मिळाला फिफा विश्वचषकात मान!

Next
ठळक मुद्देदहा वर्षीय ऋषी तेजच्या हाती वर्ल्डकपचा बॉल

सचिन कोरडे

फुटबॉलच्या विश्वचषकात भारतीय संघाला खेळताना पाहण्याचे स्वप्न अधुरेच असले तरी एका चिमुकल्याने यंदाच्या विश्वचषकात एक भारतीय म्हणून देशाला गौरव मिळवून दिला आहे. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात पहिला भारतीय बॉल बॉय म्हणून त्याचे नाव घेतले जाईल. बंगळूरु येथील दहा वर्षीय ऋषि तेज हा तो चिमुकला आहे. सोमवारी रशियातील सोची येथे बेल्जियम आणि पनामा यांच्यातील सामन्यावेळी ऋषी मैदानात मोठ्या तामझामासह मैदानात आला होता. 


 ऋषी याच्याबरोबरच तामीळनाडूची ११ वर्षीय नथानिया हिला सुद्धा बॉल गर्लची संधी मिळणार आहे. शुक्रवारी ब्राझील आणि कोस्तारिका यांच्यात होणाºया सामन्यादरम्यान ती भारतीयांना दिसणार आहे. विश्वचषक सुरु होणाºयापूर्वी या दोघांना आपली निवड झाल्याचे कळले होते. त्यामुळे दोघेही खूप उत्साहीत होते.  ऋषी हा तर सामन्याच्या आधीच्या दिवशी झोपलाच नाही. रशियात विश्वचषकाचा चेंडू हाती असणे हे स्वप्नवत आहे. मी त्या दिवसाची वाट पाहत असल्याची प्रतिक्रीया त्याने व्यक्त केली होती. 


दरम्यान, विविध देशांत फिफा ओएमबीसी हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. यासाठी ६४ शालेय मुला-मुलींची निवड करण्यात आली होती. त्यात दोन भारतीयांचाही समावेश आहे. या मुलांना विश्वचषकातील सामने पाहण्याची आणि जगप्रसिद्ध खेळाडूंसोबत चेंडू घेउन मैदानात चालत जाण्याची संधी मिळाली. भारतातील १५०० मुलांमधून या दोघांची निवड झाली आहे. या मुलांना आपला ३० सेकंदांची व्हिडिओ अपलोड करायला सांगितल्या गेला होता. 

Web Title: FIFA World Cup 2018: 'This Indian child got chance as ball boy in FIFA World Cup!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.