शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

ब्राझील-इंग्लंड रंगतदार लढतीची अपेक्षा, अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत इंग्लंड संघाची शानदार कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 4:12 AM

जर्मनी आणि ब्राझील यांच्यादरम्यानची उपांत्यपूर्व फेरीची लढत बघण्यासारखी होती. कोलकाताच्या युवा भारतीय क्रीडांगणातील गर्दी बघितल्यानंतर या लढतीचे महत्त्व स्पष्ट होते.

- गुरप्रीतसिंग संधू लिहितात...जर्मनी आणि ब्राझील यांच्यादरम्यानची उपांत्यपूर्व फेरीची लढत बघण्यासारखी होती. कोलकाताच्या युवा भारतीय क्रीडांगणातील गर्दी बघितल्यानंतर या लढतीचे महत्त्व स्पष्ट होते. विशेषत: ही लढत फुटबॉलजगतातील दोन दिग्गज संघांदरम्यान होती. सामन्यादरम्यानचे वातावरण भारतातील फुटबॉलला वेगळी पातळी प्रदान करणारे होते. अशा लढती आणि लढतीपूर्वीच्या वातावरणामुळे संघांवर दडपण येते. पण, ज्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये बसून या लढतीचा आनंद उपभोगला त्यांच्यासाठी हा अनुभव संस्मरणीय ठरणारा असेल.जर्मनीचा संघ शारीरिकदृष्ट्या मजबूत होता, असे काही म्हणू शकतात, पण दर्जाचा विचार करता ब्राझीलचा संघ उजवा होता आणि अखेर हीच बाब निकालातील अंतर स्पष्ट करणारी ठरली. विशेषत: ब्राझीलने मध्यंतरानंतर शानदार खेळ केला. जर्मनी संघाने पहिल्या हाफमध्ये त्यांच्या तुलनेत चांगला खेळ केला होता, ही बाब ब्राझीलला विसरता येणार नाही. जर्मनी संघाने एक गोलही नोंदवला आणि हा संघ त्यापेक्षा अधिक गोल नोंदवू शकला असता. ब्राझीलला आता इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी या बाबीवर लक्ष द्यावे लागेल. इंग्लंडचा संघ संतुलित आहे. अशा स्थितीत ब्राझीलला विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरण्यापूर्वी आपल्या उणिवा दूर कराव्या लागतील.कदाचित आता जगभरातील चाहत्यांच्या नजरा ब्राझील व इंग्लंड यांच्यादरम्यान खेळल्या जाणा-या उपांत्य लढतीवर केंद्रित झाल्या असतील. या अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत इंग्लंड संघाने शानदार कामगिरी केली. त्यांनी तुल्यबळ अमेरिका संघाचा पराभव केला. अमेरिका संघ मजबूत होता, हे विसरता येणार नाही. विशेषत: त्यांचा बचाव. अशा स्थितीत त्यांच्याविरुद्ध चार गोल नोंदविणाºया संघामध्ये काहीतरी विशेष तर नक्कीच असेल. त्यामुळेच उपांत्य फेरीची लढत रंगतदार होण्याची आशा आहे. अन्य एका उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मजबूत घाना संघाला पराभूत करणाºया माली संघाच्या कामगिरीमुळे प्रभावित झालो. उपांत्य फेरीच्या लढती रंगतदार आहेत. या चारही संघांमध्ये जेतेपद पटकावण्याची क्षमता आहे, पण विजेता तर सर्वोत्तम संघच राहील. (टीसीएम)

टॅग्स :Footballफुटबॉल