शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

वजन कमी करायचंय?; दररोज एक सफरचंद खा, होतील फायदेच फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 3:52 PM

वजन कमी करण्याचे सर्व उपाय करून कंटाळला असाल, तसेच काटेकोरपणे डाएट फॉलो करूनही काहीच फायदा होत नसेल तर एकदा सफरचंद खाऊन पाहाच.

वजन कमी करण्याचे सर्व उपाय करून कंटाळला असाल, तसेच काटेकोरपणे डाएट फॉलो करूनही काहीच फायदा होत नसेल तर एकदा सफरचंद खाऊन पाहाच. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि सकाळच्या डाएटमध्ये काय खावं या विचारात असाल तर आता विचार करणं सोडून द्या. तुम्ही दररोज सकाळच्या डाएटमध्ये सफरचंद खाऊन वजन कमी करण्याची प्रक्रियेचा वेग वाढवू शकता. आता तुम्ही विचारात पडला असाल की, असं खरचं शक्य आहे का? दररोज सफरचंद खाल्याने वजन कमी होतं का? जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी कोणतं सफरचंद खाणं फायदेशीर ठरतं त्याबाबत...

तसं तर सफरचंदाबाबत आपण सर्वच एक गोष्ट नेहमी ऐकतो की, 'अ‍ॅन अ‍ॅपल अ डे, किप डॉक्टर्स अव्हे' म्हणजेच, जर आपण दररोज एक सफरचंद खात असू तर अनेक आजार दूर राहतात. 

सफरचंदामध्ये आढळून येणारी पोषक तत्व 

सफरचंदाचं सेवन दररोज करण्याचा सल्ला फक्त वडिलधारी माणसंच नाहीतर डॉक्टर्सही देतात. परंतु, आपण असं अजिबातच करत नाही. पण जर तुम्ही सफरचंदामध्ये आढळून येणाऱ्या पोषक तत्वांबाबत जाणून घेतलतं तर, दररोज एक सफरचंद नक्की खाल. सफरचंदामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. जे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. 

सोडिअमचं कमी प्रमाणात

सफरचंदामध्ये सोडिअमचे प्रमाण अत्यंत कमी असतं. शरीराला आलेली सूज आणि लठ्ठपणाचं मुख्य कारण शरीरात असणारं सोडिअम अधिक प्रमाण आहे. काही लोकांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढल्यानेही त्यांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. 

खरचं सफरचंद वेगाने घटवतं वजन?

  • जर तुम्ही वजन कमी करण्याच्या हेतून डाएट प्लॅन करत असाल तर सफरचंद तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल. सफरचंदामध्ये वेगाने वजन कमी करण्यासाठी अनेक गुणधर्म आढळून येतात. 
  • जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी एका सफरचंदाचं सेवन करत असाल तर शरीराला आवश्यक फायबर आणि पोषक तत्व मिळतात. यामुळे तुम्हाला बराच वेळ भूकही लागणार नाही. 
  • सकाळच्या नाश्त्यामध्ये पोषक तत्वांचं सेवन करण्यासोबतच थोडंसंही फॅट्स नसल्यामुळे हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

 

कॅलरी काउंट 

एक बाउल कापलेलं सफरचंदामध्ये 65 कॅलरी असतात. तसेच अजिबात फॅट्स नसतात. तसेच एका मध्यम आकाराच्या सफरचंदामध्ये 110 कॅलरी असतात. 

अनेक आजारांपासून दूर ठेवतो सफरचंद 

अ‍ॅन्टीऑक्सिडंट सफरचंदामध्ये मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे कॅन्सर, डायबिटीस, अल्झायमर, पार्किन्सन यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी सफरचंद फायदेशीर ठरतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स