रात्री फळं खात असाल तर या गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 05:29 PM2019-05-07T17:29:57+5:302019-05-07T17:32:51+5:30

रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्हाला अचानक भूक लागली तर तुम्ही काय करता? रात्री भूक लागल्यानंतर कोणतं फळ खाता की चॉकलेट किंवा एखादं स्नॅक्स खाता का? खरं तर रात्री भूक लागल्यानंतर काहीही न खाता झोपण्याचा प्रयत्न केला तर झोपही येत नाही.

Should you eat fruits at night | रात्री फळं खात असाल तर या गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा...

रात्री फळं खात असाल तर या गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा...

googlenewsNext

रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्हाला अचानक भूक लागली तर तुम्ही काय करता? रात्री भूक लागल्यानंतर कोणतं फळ खाता की चॉकलेट किंवा एखादं स्नॅक्स खाता का? खरं तर रात्री भूक लागल्यानंतर काहीही न खाता झोपण्याचा प्रयत्न केला तर झोपही येत नाही. भूक लागल्यानंतर चीज बर्गर किंवा आइसक्रिम खाण्यापेक्षा फळं खाण फायदेशीर ठरतं. पण शक्यतो रात्रीच्या वेळी अधिक शुगर किंवा कॅलरी असलेलं स्नॅक्स खाणं नुकसानदायी ठरू शकतं. झोपण्यापूर्वी गोड टरबूज किंवा स्ट्रॉबेरी खाऊन भूक शांत करणं उत्तम आहे. परंतु अधिक शुगर असलेली फळं रात्रीच्या वेळी न खाणंच उत्तम ठरतं. 

झोपण्यापूर्वी फळं खा

झोपण्यापूर्वी तुम्हाला भूक लागली आणि स्नॅक्स खाण्याचं मन करत असेल तर स्नॅक्स खाण्याऐवजी फळं खाणं फायदेशीर ठरतं. फळांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल, फायटोकेमिकल आणि फायबर आढळून येतं. अनहेल्दी शुगर आणि फॅटयुक्त स्नॅक्स खाण्याऐवजी ताजी फळं खाल्याने शरीराला आवश्यक ती सर्व पोषक तत्व मिळतात. 

रात्री झोपण्यापूर्वी कोणती फळं खाणं ठरतं फायदेशीर?

जर रात्री झोपण्यापूर्वी अचानक तुम्हाला भूक लागत असेल तर तुम्ही केळी, सफरचंद यांसारख्या फायबरयुक्त फळांचं सेवन करू शकता. परंतु आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार, जेवल्यानंतर काही वेळानेच फळांचं सेवन करावं. असं करण्यामागील कारण म्हणजे, या दोन्हींचा पचनक्रियेवर वेगवेगळा परिणाम दिसून येतो. फळं पचण्यास हलकी असतात आणि पोटातून आतड्यांमध्ये जेवणाआधीच पोहोचतात. 

जेवणामध्ये प्रोटीन आणि फायबर या दोन्ही गोष्टी असतात. हे पदार्थ पचण्यासाठी जास्त वेळा लागतो. त्यामुळे तज्ज्ञांकडून सल्ला देण्यात येतो की, रात्री झोपण्यापूर्वी फळं खाणं फायदेशीर ठरतं. काही तज्ज्ञ झोपण्यापूर्वी काहीच न खाण्याचा सल्ला देतात. कारण यामुळे झोपेवर परिणाम दिसून येतात. तसेच झोपण्यापूर्वी काहीही खाल्याने शुगर लेव्हल वाढते परिणामी शरीराची ऊर्जा वाढते.

फळं खाल्याने वजन वाढतं का? 

जास्तीत जास्त फळांमध्ये कमी कॅलरी आढळून येतात. त्यामुळे यांच्या सेवनाने वजन वाढत नही. एक कप आइस्क्रिमसोबत फळं एकत्र करून खाल्याने वजन वाढतं. रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी केळी खाणं फायदेशीर ठरतं. परंतु जेवण आणि झोपण्याच्या वेळेमध्ये अंतर असणं गरजेचं असतं. परंतु शक्यतो दररोज केळी खाणं टाळा नाहीतर वजन वाढू शकतं. 

झोपण्यापूर्वी फळं खाल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो?

जर तुम्ही आधीपासूनच पोटाच्या समस्यांचा सामना करत असाल तर फळं खाल्याने समस्या वाढू शकते. रात्री झोपण्यापूर्वी फळं खाल्याने पोटत गडबड होऊ शकते आणि झोपेवरही परिणाम होऊ शकतो. तसेच तुम्हाला थकवाही जाणवू शकतो. 

अननस आणि संत्र्यासारख्या फळांमध्ये अॅसिडचे प्रमाण अधिक असते. ज्या व्यक्ती अॅसिड रिफ्सक्सने पीडित आहेत. त्यांनी शक्यतो अॅसिडीक फळांचं सेवन करणं टाळावं. 

जर तुम्ही डायबिटीजच्या समस्येने त्रस्त असाल तर फळं खाल्याने तुमच्या समस्या आणखी वाढू शकतात. कारण फळांमध्ये नॅचरल साखर आढळून येते, जी ब्लड शुगरचा स्तर वाढवते. त्यामुळे फळांचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Should you eat fruits at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.