‘पोर्न’वर बंदी आणावी की नाही हा वाद केवळ आपल्याच देशात नाही तर अमेरिकेतही प्रचंड गाजत आहे. तेथील उटाह राज्यात लवकरच पोर्नला सामाजिक आरोग्यासाठी धोकादायक म्हणून घोषित करणारा एक कायदा पारित केला जाणार आहे.
मसुद्यानुसार, पोर्नमुळे व्यक्तीच्या आरोग्यात आणि एकुण सामाजिक जीवनात अनेक वाईट परिणाम होतात.
उटाहचे गव्हर्नर गेरी आर. हर्बट हे या बिलवर सही करणार आहेत. या बिलमध्ये म्हटले आहे की, पोर्नमुळे समाजात लैंगिक स्वैराचार वाढत आहे. तरुण आणि शाळकरी मुलांवर पोर्नमुळे वाईट संस्कार बिंबवले जात आहेत. पुरुषांमध्ये यामुळे लग्नाविषयी नकारात्मक दृष्टीकोन बळावत आहे. एवढेच नाही तर, पोर्न पाहणे व्यसन आहे.
पोर्नवर थेट बंदी आणण्याऐवजी अशा प्रकारे पोर्नचा समाजातील प्रभाव करण्यावर भर देणे हा या बिलचा उद्देश आहे. पोर्न पाहणे किंवा बाळगणे दंडणीय गुन्हा घोषित करण्याऐवजी त्याचे दुष्परिणाम आपण समाजाला सांगू शकलो तर नक्कीच फरक पडेल, प्रवक्ते जॉन कॅक्स म्हणाले.
उटाहमध्ये ‘पोर्न’ सामाजिक आरोग्यास धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 20:26 IST