टॉम ओलांद नवा स्पायडरमॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 15:44 IST2016-03-27T22:44:35+5:302016-03-27T15:44:35+5:30

किशोरवयीन कलाकार टॉम ओलांद आता नव्या स्पायडरमॅन पटात मुख्य भूमिकेत दिसेल. यापूर्वी टॉम ‘बिली इलियट द म्युझकिल’ या हॉलीवूड पटाद्वारे प्रकाशझोतात आला होता. सोनी पिक्चर्स व मार्व्हल स्टुडिओजने ओलांदची निवड या भूमिकेसाठी निश्चित केली आहे.

Tom Oland Nava Spiderman | टॉम ओलांद नवा स्पायडरमॅन

टॉम ओलांद नवा स्पायडरमॅन

शोरवयीन कलाकार टॉम ओलांद आता नव्या स्पायडरमॅन पटात मुख्य भूमिकेत दिसेल. यापूर्वी टॉम ‘बिली इलियट द म्युझकिल’ या हॉलीवूड पटाद्वारे प्रकाशझोतात आला होता. सोनी पिक्चर्स व मार्व्हल स्टुडिओजने ओलांदची निवड या भूमिकेसाठी निश्चित केली आहे. नवा स्पायडरमॅन पट २८ जुलै २०१७ रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. निर्माता केविन फीज व अ‍ॅमी पास्कल यांनी नव्या स्पायडरमॅनच्या शोधासाठी जागतिक स्तरावर व्यापक मोहीम हाती घेतली होती. या दीर्घ शोधानंतर आता टॉम ओलांदचे नाव या भूमिकेसाठी निश्चित करण्यात आले आहे. निर्माता कंपनीने टॉम ओलांदच्या ‘द इम्पॉसिबल’, ‘वुल्फ हॉल’ यातील भूमिकांनी प्रभावित होऊन त्याची निवड केली.

Web Title: Tom Oland Nava Spiderman