शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
3
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
4
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
5
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
6
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
7
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
8
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
9
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
10
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
11
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
12
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
13
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
14
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
15
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
16
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
17
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
18
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
19
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गुगलवर सनी लिओनी 'हीट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:21 IST

लोकप्रिय सर्च इंजिन 'गुगल'ने २0१५ मध्ये सर्वाधिक शोधली गेलेली माहिती जाहीर केली आहे. त्यामध्ये भारत...

लोकप्रिय सर्च इंजिन 'गुगल'ने २0१५ मध्ये सर्वाधिक शोधली गेलेली माहिती जाहीर केली आहे. त्यामध्ये भारतामध्ये सर्वाधिक शोधलेल्या व्यक्तींमध्ये सनी लिओनीने सर्वांत वरचे स्थान पटकावले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहावे स्थान मिळाले आहे. भारतात सर्वाधिक शोधलेल्या पहिल्या दहा व्यक्तींमध्ये लिओनीनंतर सलमान खान, एपीजे अब्दुल कलाम, कॅटरिना कैफ, दीपिका पदुकोन, यो यो हनी सिंग, काजल अग्रवाल, आलिया भट्ट यांचा क्रमांक आहे. समाधानाची बाब ही की देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी सेलिब्रिटींनी खचाखच भरलेल्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. तर मोदींना 'टॉप १0'च्या यादीत सर्वांत शेवटचे स्थान मिळाले आहे.

मोदींना २0१४ मध्ये दुसरा क्रमांक मिळाला होता, तर लिओनी पहिल्याच क्रमांकावर होती. सलमानने आता दुसरे स्थान पटकावले आहे. हिट अँड रन प्रकरणामुळे सलमानविषयी देखील अनेकवेळा गुगलवर माहिती सर्च करण्यात आली आहे. बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो रे, दबंग अशा चित्रपटांमुळेही सलमानला वरचे स्थान मिळाले आहे. सनी लिओनीने मात्र या वर्षीही आपले स्थान कायम ठेवले आहे. यंदा एक पहेली लीलामधून सनीने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली होती. तसेच तिच्याविरोधात एका गृहिणीने तक्रार केली होती. तसेच कंडोमची जाहिरात केल्यानेही ती चर्चेत आली होती. त्यामुळे इंटरनेटवर सनीला अनेकांनी अनेकवेळा सर्च केल्याचे गुगलने म्हटले आहे. याशिवाय अन्य गटातील सर्वाधिक सर्च झालेल्या विषयांची यादीही 'गुगल'ने जाहीर केली आहे.