शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
4
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
5
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
6
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
7
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
8
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
9
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
10
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
11
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
12
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
13
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
14
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
15
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
16
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
17
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
18
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
19
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
20
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

​नितळ, निरोगी व मुलायम त्वचेसाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 23:41 IST

जसे वय वाढते तसे आपल्या त्वचेवर सुरकूत्या दिसू लागतात आणि वृद्ध होत असल्याची चिन्ह आपणास जाणवतात.

जसे वय वाढते तसे आपल्या त्वचेवर सुरकूत्या दिसू लागतात आणि वृद्ध होत असल्याची चिन्ह आपणास जाणवतात. मात्र वृद्ध होणे कोणालाच आवडत नसल्याने आपली त्वचा नितळ, निरोगी, मुलायम व तकाकीयुक्त दिसण्यासाठी प्रत्येकजण कसोसीने प्रयत्न करताना दिसतात. आजच्या लेखात आपण नितळ व निरोगी त्वचेसाठी व तारुण्यता टिकविण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत हे जाणून घेऊ...

वाढत्या वयाबरोबर त्वचेचे विकार वाढण्याची शक्यता जास्त असते. मात्र वेळेवरच काळजी घेतल्यास निरोगी व नितळ त्वचा दिर्घ काळापर्यंत जोपासली जाऊ शकते. आपले आरोग्य निरोगी असेल तर आपली त्वचादेखील तकाकीयुक्त, नितळ व मुलायम राहते. आपल्या शरीराचे संरक्षण करण्यात त्वचेची भूमिक ा  अत्यंत महत्त्वाची आहे. वातावरणातील बदलांचा परिणाम हा सर्वप्रथम त्वचेवरच होतो. तारुण्यातील तारुण्यपिटीका, म्हातारपणातील सुरकुत्या आणि राग आल्यास लाल रंग धारण करणे हे त्वचेचे गुणधर्म आहेत. 

त्वचा विकार होण्याची प्रमुख कारणे-
*  सतत फास्ट फूडचे सेवन करणे.
*  त्वचेच्या स्वच्छतेबाबत दुर्लक्षित असणे.
*  सतत धूळ, माती व प्रदूषणाच्या संपर्कात राहणे.
*  त्वचेचे विकार झालेल्यांच्या संपर्कात राहणे. 
*  आंघोळ किंवा घाम आल्यावर त्वचेची काळजी न घेणे म्हणजेच व्यवस्थित कोरडी न करणे. 
*  केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा त्वचेवर अती वापर करणे. 

त्वचा विकार झाल्याची काही लक्षणे
*  त्वचा नेहमी खाज येणे व कोरडी पडणे किंवा कोंड्याची निर्माण होणे
*  तारुण्यपिटीका व पुरळ येणे
*  त्वचेचा काहीभाग लालसर होणे तसेच दाह होणे
*  त्वचेचे मूळ रंग बदलणे
*  त्वचेला दुर्गंध येणे. 

त्वचेची काळजी कशी घ्याल?
*  आंघोळीनंतर किंवा घाम आल्यानंतर त्वचा ओलसर असल्यास त्वचा काळजीपूर्वक कोरडी करणे तसेच जास्त घाम येणाºया ठिकाणी पावडर वापरणे.
*  त्वचेवर नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणे 
*  त्वचा नितळ व निरोगी राहण्यासाठी आहारदेखील महत्त्वाचा असून त्यात गाईचे तूप, बदाम, खजूर आदी सारख्या सुका मेवांचा समावेश असावा. 
* त्वचेची विशेषत: कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दुधावरची साय चांगले मॉयश्चरायझरचा वापर करावा.
*  त्वचेचा ओलावा टिकाविण्यासाठी पाणी भरपूर प्यावे तसेच आॅलिव्ह आॅइल किंवा तेलाचा वापर करावा. 
*  त्वचेला कांती मिळविण्यासाठी किंवा उजळ रंग प्राप्त होण्यासाठी त्वचेवर ब्लिचचा वापर शक्यतो टाळावा. 
* ग्रामीण भागातील मुलांच्या त्वचेवर मोठ्या आकारातील पुरळ येत असतात. यालाच बँड असे म्हणतात. हा एक त्वचेचा विकार असून त्वचेची अस्वच्छता हेच त्याचे मुख्य कारण आहे.
* केमिकल्सयुक्त साबणाऐवजी नैसर्गित घटक असलेल्या आयुर्वेदिक उटण्याचा वापर करावा. 

तयार करा घरगुती आयुर्वेदिक उटणे

डाळीचे पीठ + संतरा साल + आवळा पावडर +  अनंता + नागरमोथा + वाळा + चंदन पावडर  हे सर्व घटक एकत्र वाटून घेऊन भरणीत भरून ठेवावे आणि आंघोळीसाठी याचाच वापर करावा. हे उटणे आंघोळीसाठी वापरल्याने त्वचेचे आरोग्य निरोगी राहुन नितळ व मुलायम होते.