शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

​रामोजी ‘फिल्म सिटी’...एक विलोभनीय पर्यटनस्थळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 15:46 IST

रामोजी ‘फिल्म सिटी’ मध्ये फक्त चित्रपटांचीच निर्मिती होत नसून, हे एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होेत आहे. दक्षिण भारतातील हैदराबादमध्ये ही सुंदर फिल्म सिटी असून, सुमारे १५ हजार एकरात उभारली आहे.

रामोजी ‘फिल्म सिटी’ मध्ये फक्त चित्रपटांचीच निर्मिती होत नसून, हे एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होेत आहे. दक्षिण भारतातील हैदराबादमध्ये ही सुंदर फिल्म सिटी असून, सुमारे १५ हजार एकरात उभारली आहे. विशेष म्हणजे याची नोंद गिनिज बुकमध्येही झाली असून, जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स आहे. यामुळेच येथे अनेक बॉलिवूड, टॉलिवूड फिल्म निर्मात्यांची मोठी सोय झाली आहे. चित्रपट निर्मितीशी संबंधित सगळ्या गोष्टी येथे उपलब्ध आहेत. एकाहून एक सुंदर उद्याने, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य व अप्रतिम वास्तू, बालकांसाठी असलेली सरस ‘सरप्रायझेस’ येथे आहेत. हैदराबाद शहरापासून सुमारे एक ते दीड तासाच्या अंतरावर हे निसर्गरम्य ठिकाण आहे. आजपर्यंत येथे तीन हजारांहून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. गाव-खेड्यापासून ते विदेशातल्या चकाचक लोकेशन्ससह विमान ते रेल्वेस्थानक अशी नानाविध लोकेशन्स येथे उपलब्ध आहेत. एका बाजूने न्यायालय तर दुसरीकडून आयुक्तालय, एका बाजूने मध्यवर्ती तुरुंग तर दुसरीकडून आलिशान बंगला, एकीकडे विमानतळ तर दुसरीकडे रुग्णालय आणि तिसरीकडे हॉटेल असे थक्क करणारे ‘मल्टिपर्पज’ सेट्स इथे दिमाखात उभे आहेत.याशिवाय फंडुस्तान, बोरासुरा (जादूगाराचा अड्डा), भगवतम, मोहक फुलपाखरू पार्क, रामोजी फिल्म फंडा, रामोजी मुव्ही मॅजिक, रामोजी टॉवर पर्यटकांच्या आनंदात भर टाकतात. ‘शांतिनिकेतन’ या बजेट हॉटेलसह ‘तारा‘, ‘सितारा’ ही आलिशान हॉटेल्स पर्यटकांच्या गरजेनुरूप सेवेला सज्ज आहेत. पर्यटनासह शाही लग्नसोहळे, कॉपोर्रेट मिटिंग्ज, वर्कशॉप्स आदींसाठीही रामोजी फिल्मसिटीची दालने खुली आहेत. अशा या सर्वसुविधा संपन्न ठिकाणाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी !