शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

​प्रसिद्धी पाकी कव्वाल अमजद साबरी यांची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 19:50 IST

प्रसिद्धी पाकी कव्वाल आणि सुफी गायक अहमद साबरी यांची आज अज्ञात मारेकºयांनी गोळ्या झाडून हत्या केली.

प्रसिद्धी पाकी कव्वाल आणि सुफी गायक अमजद साबरी यांची आज अज्ञात मारेकºयांनी गोळ्या झाडून हत्या केली. ४५ वर्षांचे साबरी ब्रदर्स या कव्वाली ग्रुपचे सर्वेसर्वा अमजद साबरी यांची बुधवारी दुपारी कराचीमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अमजद साबरी यांच्या मोटारीच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या साबरी यांना लगेचच रुग्णालयात हलविण्यात आले. पण तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.अमजद साबरी आणि त्यांच्या एक सहकारी दोघेही मोटारीतून निघाले असताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून लियाकताबाद भागामध्ये त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या त्यांच्या मेंदूत घुसल्याचे पाकिस्तानातील  डॉन  या वेबसाईटने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे अमजद पाकिस्तानचे लोकप्रिय कव्वाली गायक मकबूल साबरी यांचे भाचे होते. मकबूल यांचे 2011 मध्ये निधन झाले होते. अमजद यांच्‍या दोन कव्‍वाली अत्‍यंत गाजल्‍या. शिवाय 'भर दो झोली', 'ताजदार-ए-हरम' आणि 'मेरा कोई नहीं है तेरे सिवा' ही गाणे लोकांच्‍या ओठांवर आहेत. साबरी एक यशस्‍वी व्‍यावसायिकही होते. साबरी यांना पाकिस्तानमध्‍ये लोकप्रिय कव्‍वाली गायक म्‍हणून ओळखले जात होते.2014 मध्‍ये इस्लामाबाद हायकोटार्ने ईशनिंदेच्‍या आरोपात जियो आणि एआरवाय न्यूजला नोटिस जाहीर केली होती. या दोन्‍ही वाहिन्‍यांनी मॉर्निंग शोमध्‍ये एक कव्‍वाली दाखवली होती. या कव्‍वालीमध्‍ये लग्‍नाचा उल्‍लेख करुन धार्मिक भावना दुखावण्‍यात आल्‍या होत्‍या. लोकांनी त्‍यांच्‍याविरोधात संताप व्‍यक्‍त केला होता. काही दिवसांपूर्वी त्‍यांनी अमेरिका आणि युरोपच्‍या काही देशांमध्‍ये कार्यक्रम केले होते.