शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जनुकांमध्ये बदल करण्यास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 11:36 IST

जनुकांमध्ये बदल करण्यास परवानगीभविष्यातील मानव हे अतिप्रगत असणार यात काही शंका नाही. बाळ पोटात असल्यापासूनच त्याला सर्व रोगापांसून बचाव करण्याची शक्ती आणि 

जनुकांमध्ये बदल करण्यास परवानगीभविष्यातील मानव हे अतिप्रगत असणार यात काही शंका नाही. बाळ पोटात असल्यापासूनच त्याला सर्व रोगापांसून बचाव करण्याची शक्ती आणि क्षमता देण्याचे तंत्रज्ञान विकसित होईल. त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून इंग्लंडमध्ये अर्भकाच्या जनुकांमध्ये कृत्रिम बदल करण्याला वैद्यकीय प्रायोगांसाठी परवानगी देऊन एक नवाच पायंडा घातला आहे. चीनमधील वैज्ञानिकांना सर्वप्रथम जुनकांमध्ये कृत्रिम हस्तक्षेप करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमिवर स्टेम सेल वैज्ञानिक कॅथी नायकन यांना अशा पद्धतीचे संशोधन आणि प्रयोग करण्याची मुभा दिली.द ह्युमन फर्टिलायझेशन अँड एम्ब्रॉयलॉजी आॅथॉरिटी (एचएफईए)ने फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटचा ‘जेनेटिक एडिटिंग’ टेक्निकबद्दलचा प्रस्तावाला मान्यता दिली आहे. कॅथी यांनी माहिती दिली की, ‘आम्ही केवळ संशोधनासाठी पहिल्या सात दिवसांमध्ये प्रजननक्षम बीजांडांचा विकास कसा होतो याचा अभ्यास करणार आहोत. एक पेशी पासून 250 पेशींमध्ये विकसित होण्याºया प्रक्रियेचे अध्ययन करण्यात येणार आहे.’ अनेक तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की, ‘हा अभूतपूर्व निर्णय आहे.. वैद्यकीय क्षेत्रात यामुळे नवनवीन शोध लागतील.’ ‘सीआरआयएसएपीआर कॅस९’ असे या जनुकांमध्ये कृत्रिम बदल करण्याच्या तंत्रज्ञानाचे नाव आहे.अनेक मानवधिकार संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. अशा तंत्रज्ञानातून भविष्यात कृत्रिम पद्धतीने अर्भक तयार केले जातील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ‘ह्युमन जेनेटिक्स अलर्ट’ मोहिमेतून डेव्हिड किंग याविषयी जनजागृती करण आहेत. परंतु वैज्ञानिकांना अशा प्रकारे कृत्रिम अर्भक विकसित करण्याची परवानगी नाही. उलट जन्मजात असणाºया अनेक समस्या, रोग, आजारांपासून बाळाला वाचवण्याचे काम याद्वारे करण्यात येणार असल्याचे संशोधकांनी सांगितले.