​धोनीच्या स्तुतीमुळे पाकिस्तानी मॉडेल आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 13:25 IST2016-06-25T07:55:24+5:302016-06-25T13:25:24+5:30

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे त्याच्या शांत स्वभावामुळे भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत.

Pakistani models have come here due to the praise of Dhoni | ​धोनीच्या स्तुतीमुळे पाकिस्तानी मॉडेल आली चर्चेत

​धोनीच्या स्तुतीमुळे पाकिस्तानी मॉडेल आली चर्चेत

म इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे त्याच्या शांत स्वभावामुळे भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. अशीच एक धोनीची चाहती मॉडेल माथिरा मोहम्मद धोनीच्या बाबतीच नेहमी चर्चेत असते. ती नेहमीच धोनीची स्तुती करते आणि चर्चेचा विषय बनते. यावेळीही तीने धोनीची अशी स्तुती केली, त्यामुळे पाकिस्तानी काही खेळाडू नाराज झाले. 

भारतीय संघ पाकिस्तानच्या दौºयावर असताना ज्या हॉटेलमध्ये डिनर झाला तिथे माथिरा देखील उपस्थित होती. तिने पाकिस्तानच्या खेळाडूंना आॅटोग्राफ मागितला तेव्हा काय झालं हा अनुभव शेअर केला आहे.

पाकिस्तानच्या काही खेळाडूंनी आॅटोग्राफ दिला, मात्र काही खेळाडू जेवताना तरी सोडा असं म्हणून ओरडले, असं माथिराने सांगितलं.
पाकिस्तानच्या खेळाडूंनी झिडकारल्यामुळे अपमानास्पद वाटलं. मात्र तेवढ्यातच भारताच्या एका खेळाडूने आॅटोग्राफ दिला. तो खेळाडू होता महेंद्र सिंह धोनी.

धोनीने केवळ आॅटोग्राफच दिला नाही तर गप्पाही मारल्या. आम्हीही क्रिकेटर आहोत, आमचा आॅटोग्राफ घेतला तरी चालेल,असं धोनीने माथिराला सांगितलं.

Web Title: Pakistani models have come here due to the praise of Dhoni