शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

​आता ‘व्हॉट्स अ‍ॅप’ वापरा विना इंटरनेट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 15:12 IST

बदलत्या जीवनशैलीत सध्या व्हॉट्स अ‍ॅप प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनला आहे.

बदलत्या जीवनशैलीत सध्या व्हॉट्स अ‍ॅप प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनला आहे. एक दिवसही कोणी लांब राहू शकत नाही. आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान-सहान गोष्टही अगोदर आपण व्हॉट्स अ‍ॅपवर शेअर करतो. एवढे महत्त्व आपल्या आयुष्यात आपण व्हॉट्स अ‍ॅपला देतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्स अ‍ॅपला इंटरनेटशिवाय वापरताच येणार नाही. मात्र बदलत्या टेक्नॉलॉजीने यावरही पर्याय शोधून काढला असून, आता विना इंटरनेट आपण व्हॅट्स अ‍ॅप वापरु शकता. कसे ते जाणून घ्या...सर्वप्रथम तुम्हाला यासाठी फक्त एक चॅट सीम विकत घ्यावे लागेल. ते एक सीमकार्डच आहे. याद्वारे तुम्ही कधीही खंड न पडता व्हॉट्स अ‍ॅप वापरु शकाल. विशेष म्हणजे यासाठी आपल्या मोबाईलमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही. हे एकमेव असे सीमकार्ड आहे की, इंटरनेट कनेक्शन शिवाय व्हॉट्सअ‍ॅपबरोबरच व्हीचॅट, मेसेंजर आणि हाईक यासारखे मॅसेजिंग अ‍ॅप वापरता येतात. हे चॅटसीम सुमारे १५० देशांमध्ये काम करते. तसेच यासाठी एक्स्ट्रा चार्ज देखील द्यावा लागत नाही. एकदा सीम घेतले की त्यानंतर खर्च येत नाही. याची किंमत सुमारे १० युरो असून ते भारतातही उपलब्ध आहे. भारतात याची किंमत सुमारे ९०० रुपये आहे. याची खरेदी अधिकृत वेबसाईटवरुन करु शकतो. त्यानंतर वेबसाईटवरुनच अ‍ॅक्टिव्ह करता येईल. त्यानंतर लगेच याचा वापर करता येईल. ग्रामीण भागात किंवा प्रवासादरम्यान बहुतेक इंटरनेटची रेंज मिळत नाही. अशावेळी चॅट सीम फायद्याचे ठरुन आपण व्हॉट्स अ‍ॅप वापरू शकतो.