मायलीचा ३१ कोटीचा बंगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 15:32 IST2016-03-27T22:32:50+5:302016-03-27T15:32:50+5:30

पॉप सिंगर मायली सायरसने लॉस एंजिलिस येथील हिडन हिल्स येथे एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत ५० लाख डॉलर (जवळजवळ ३१ कोटी रु पये) इतकी आहे. मायली घराच्या परिसरात घोडस्वारी आणि फार्मिंग करणार आहे.

Miley's 31 crores bungalow | मायलीचा ३१ कोटीचा बंगला

मायलीचा ३१ कोटीचा बंगला

प सिंगर मायली सायरसने लॉस एंजिलिस येथील हिडन हिल्स येथे एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत ५० लाख डॉलर (जवळजवळ ३१ कोटी रु पये) इतकी आहे. मायली घराच्या परिसरात घोडस्वारी आणि फार्मिंग करणार आहे. मायलीला अ‍ॅडव्हेंचरस स्पोर्ट्ससाटी ओळखले जाते. जवळजवळ ५.५० एकर परिसरात हा बंगला असून एक एकर क्षेत्र तिने घोडस्वारीसाठी राखून ठेवले आहे. या बंगल्यात सहा हजार चौ. फुटाचा लिव्हिंग एरिया आहे. शिवाय सात बेडरु म, सहा बाथरु म आणि एक चिकन कूप आहे. या बंगल्याचा बेडरु म लॉफ्ट शैलीचे आणि दरवाजे फ्रेंच शैलीचे आहेत. मायली या बंगल्याच्या एका भागात भाज्या आणि फळांची शेती करणार आहे.

Web Title: Miley's 31 crores bungalow