शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

बॉससोबत चांगले संबंध तयार करण्यासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 20:05 IST

आॅफिसमध्ये आपल्या बॉससोबत संबंध हे चांगले राहणे खूप महत्वाच ेआहे.

आपले संबंध चांगले नसेल तर  काम करणे अवघड होऊ शकतो. याकरिता चांगले संबंध तयार करावेत. त्याकरिता वेळेवर आपले काम पूर्ण करावे. बॉसला आपण आपले काम हे वेळेवेर संपवितो हे वाटले पाहीजे. एखाद्यावेळेला आपल्याला जादा काम दिले असेल तर ते सुद्धा पूर्ण जबाबदारीने करावे.
स्वभाव ओळखा : काही बॉस हे केवळ आपला मतलब असणारी माहिती घेतात. तर काहींना छोट्या छोट्या गोष्टीही माहिती करुन घ्यावयाची असते. मित्र व क टुंबासारखेही काहीजण वागत असतात. तर काही प्रोफेशनली वागतात. याकरिता आपण आपले बॉस कोणत्या स्वभावाचे आहेत. त्यानुसार त्यांच्याशी संबंध तयार करावेत.
कामाला नकार नको : आपल्याला दिलेले कोणतेही काम करण्यासाठी नकार देण्याची कधीही चूक करू नका. आपण कामापासून बचाव करीत आहेत, हे बॉसला वाटायला नको. ते काम जर आपल्या क्षेत्रात येत नसेल किंवा त्यामुळे आपण नाराज असाल तर एकटे जाऊन बॉससोबत बोलावे. त्यांनी जर ते काम तुम्हालाच करावे लागेल असे सांगितले तर ते करावे अन्यथा दुसरीकडे नोकरी शोधावी.
बॉसची आवड ओळखा : आपल्या बॉसला ईमेल,फोन कॉल व मीटींग यापैकी बोलण्यासाठी कोणती पद्धत आवडते. हे अगोदर ओळखायला शिकले पाहीजे. तुम्ही जर थेट त्यांच्या कॅबिनमध्ये गेला तर त्यांचे लक्ष हे विचलीत होऊ शकते.
कारणे सांगू नका : आपल्याला दिलेले काम पूर्ण झालेले नसेल तर कोणतीही कारणे बॉसला सांगू नका. कारण की, कारणे ऐकून घेणे हे कोणत्याही बॉसला अजिंबात आवडत नाही. त्याकरिता कारणे सांगणे टाळावे. आपल्याला दिलेल काम हे पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपली असते. ते जर पूर्ण झाले नाहीतर ती आपली चूक आहे. यामध्ये कोणतेही कारणे सांगू नका, त्यामुळे बॉसचा मूड खराब होऊ शकतो.

चांगले काम करा : बॉससोबत संबंध राहण्यासाठी दिलेले काम हे चांगल्याप्रकारे करण्याची सवय करा.
फीडबक घ्यावा : आपण करीत असलेल्या कामासंबंधी आपल्या बॉसकडून फिडबक मागून घ्यावा. ज्यादाकरुन बॉस स्वत: फीडबक देत असतात. परंतु, त्यांनी जर दिला नसेल तर त्यांच्याकडून तो मागावून घ्यावा. त्यामुळे आपल्या कामामध्ये आपल्याला सुधारणा करता येते.
प्रत्येक गोष्ट शेअर करु नका : आपला बॉस आपल्यासोबत हसून बोलत असेल तर आपण त्यांना बेस्ट फें्रड बनवावे. परंतु, आपली प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी शेअर करु नका. बॉससोबत कधीही अंतर राखलेलेच योग्य असते.
सुटीची अगोदर महिती द्या : आपल्याला सुटीवर जायाचे असेल तर बॉसला अगोदरच त्याची माहिती द्यावी. चार दिवसाचे सुटीवर आपण जात आहोत व एक दिवस अगोदर बॉसला आपण सांगितले तर ते बरोबर नाही. अगोदरच सांगितले तर आपल्या कामाची इतरांना विभागणी करुन दिली जाते.