शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांसोबत प्रेमाने वागा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 19:56 IST

मुलांना प्रामणीक बोलण्याची सवय लावणे आवश्यक आहे

 लहान मुले मातीच्या चिकलासारखे असतात. त्यांच्यावर जसे संस्कार केले जातात, तसे ते घडतात.. शाळेत जायला लागल्यानंतर ते जास्त वेळ घराबाहेर राहतात. व वेगवेगळ्या मुलांसोबत त्यांचा संपर्क येतो. त्यामुळे ते चांगल्या व वाईट या दोन्हीही गोष्टी शिकत असतात. खोटे बोलणेही ते यामधून शिकतात. खासकरुन लहान मुले हे शिक्षा होईल, या भितीपोटी खोटे बोलतात. त्याकरिता त्यांना लहानपणापासूनच त्यांना सर्व गोष्टीबद्दल बोलण्याचे स्वातंत्र देणे आवश्यक आहे.  प्रत्येक गोष्ट ही वाईट व चांगली कशी आहे, हे समजून सांगावे.  त्यामुळे मुले हे तुमची प्रत्येक गोष्ट ऐकायला लागतील. ३ ते ७ वर्ष वयोगटातील मुले हे थोड्याफार प्रमाणात खोटे बोलतात.आई वडिल व शिक्षकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आपल्या मुलांना आपण एखादे वचन दिले तर ते नक्की निभावणे आवश्यक आहे. आपण त्यांच्यावर विश्वास करतो असे त्यांना वाटणे आवश्यक आहे. त्यामुळे ते वाईट गोष्टीकडे वळणार नाहीत किंवा कोणतीही गोष्टी आपल्याला सांगण्याचा संकोच बाळगणार नाही. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ते तुमची परवानगी घेतील. व नेहमी प्रामाणीकपणे  बोलतील. मुलांचे सर्वात पहिले गुरु हे आईवडिल असतात. ते जर खोटे बोलत असेल तर मुलांनाही त्यांचीच सवय लागते. आपण मुलांसमोर रोल मॉडल आहोत, हे आईवडिलांनी कधीही विसरु नये. एखाद्या परिस्थितीत खोटे बोलावे लागले तर त्यांना यामागचे कारण सांगावे. मुलांच्या प्रामाणीक बोलण्याचे व कामाचे कौतुक करावे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळते. काळानुसार आईवडिलांनी आपल्या मानसीकतेत बदल करणे आवश्यक आहे. पूर्वीसारखे मुलांना मारण्याचे दिवस राहिले नसून, उलट प्रेमाने त्यांना समजावून सांगावे.