काइली सोशल मीडियापासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 21:11 IST2016-04-15T04:11:46+5:302016-04-14T21:11:46+5:30

टेलीव्हिजन रिअ‍ॅलिटी स्टार काइली जेनर सोशल मीडियावर प्रत्येक विषय शेअर करीत नाही. कारण खासगी आयुष्यातील काही गोष्ट ती सार्वजनिक करू इच्छित नाही. 

Kylie is away from social media | काइली सोशल मीडियापासून दूर

काइली सोशल मीडियापासून दूर

लीव्हिजन रिअ‍ॅलिटी स्टार काइली जेनर सोशल मीडियावर प्रत्येक विषय शेअर करीत नाही. कारण खासगी आयुष्यातील काही गोष्ट ती सार्वजनिक करू इच्छित नाही. याबाबत काइलीने सांगितले की, माझ्या आयुष्यात एक खुप मोठा प्रसंग येवून गेलेला आहे. मात्र तो प्रसंग मला अजिबात इंटरनेटवर शेअर करायचा नाही. लोकांना वाटते की, मी टिव्ही रिअ‍ॅलिटी शोशी संबंधित असल्याने त्यांच्यांशी सर्वच गोष्टी शेअर करायला हव्यात. मात्र असे मी अजिबात करू इच्छित नाही. मला असे वाटते की, प्रत्येक सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील बराचसा वेळ पडद्यावरच व्यतीत करीत असतात. त्यामुळे या व्यतिरिक्त सोशल मीडियावर इतर खासगी गोष्टी शेअर करायची आवश्यकता नाही. मी दिवसातून केवळ दहा मिनिटेच स्नॅपचॅट करीत असते. तसेच मला इंस्टाग्रामवर कोणाशी वाद घालयला अजिबात आवडत नसल्याचेही तिने सांगितले.

Web Title: Kylie is away from social media