​‘हिल पोरी हिला’ नव्या अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 19:55 IST2016-03-24T02:55:55+5:302016-03-23T19:55:55+5:30

गायिका आशा भोसले यांची नात झनई भोसले हिने काही दिवसांपूर्वी तृतीयापंथीयांच्या पहिल्या बॅँडसोबत एका गाण्याचं रेकॉर्डिंग केले होते. 

'Hill Pori Hila' New Decade | ​‘हिल पोरी हिला’ नव्या अंदाजात

​‘हिल पोरी हिला’ नव्या अंदाजात

यिका आशा भोसले यांची नात झनई भोसले हिने काही दिवसांपूर्वी तृतीयापंथीयांच्या पहिल्या बॅँडसोबत एका गाण्याचं रेकॉर्डिंग केले होते. यशराज फिल्मच्या ‘६ पॅक बॅँड’ तर्फे तयार करण्यात आलेले हे गाणे आज रिलीज झाले आणि इंटरनेटवर ते सर्वांच्याच पसंतीला उतरत आहे. 

उषा मंगेशकरांचे अजरामर गाणे ‘हिल पोरी हिला’ या गाण्याची धून आणि त्या गाण्यातील शब्द या गाण्यात वापरले आहेत. मात्र बाकीचे बोल वेगळे आहेत. विशेष म्हणजे या गाण्यात कोणत्याही आधुनिक वाद्यांचा वापर केला नाही. 

Web Title: 'Hill Pori Hila' New Decade