गागाची लगीनघाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 03:30 IST2016-03-17T10:30:51+5:302016-03-17T03:30:51+5:30

हॉलीवुड गायिका लेडी गागाने तिच्या लग्नाच्या तयारीची संपुर्ण जबाबदारी कुटूंबातील अन्य महिलांवर सोपविली आहे.

Gagachi Sparkline | गागाची लगीनघाई

गागाची लगीनघाई

लीवुड गायिका लेडी गागाने तिच्या लग्नाच्या तयारीची संपुर्ण जबाबदारी कुटूंबातील अन्य महिलांवर सोपविली आहे. गागाने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, जर मी या कामात घरच्यांना सहभागी केले नाही तर, त्या सगळ्या महिलांचा रोष मला सहन करावा लागेल. यावेळी तिने गमतीने सांगितले की, लग्नासाठी मला जगभरातून मदत मिळत आहे. परंतु घरच्या महिलांना सहभागी केले नाही, तर त्या मला जीवंत सोडणार नाहीत. तसेच टेलर किन्नीसोबतचा तिचा विवाह अगदी साध्या पद्धतीने व्हावा अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक न्यूज चॅनलवर माझ्या लग्नाच्या बातम्या झळकव्यात अशी माझी अजिबात इच्छा नसल्याचेही तिने स्पष्ट केले. गागा आणि किन्नीचा गेल्या व्हॅलेंटाइन डेला साखरपुडा झाला होता.

Web Title: Gagachi Sparkline