​गेमर्सना वावगे ‘टचस्क्रीन’चे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 00:33 IST2016-04-30T19:03:09+5:302016-05-01T00:33:09+5:30

व्हिडिओ गेमचे खरे फॅन्स मात्र, टचस्क्रीनवर गेम खेळणे जाणीवपूर्वक टाळतात. 

Gadgets Wave's 'Touchscreen' | ​गेमर्सना वावगे ‘टचस्क्रीन’चे

​गेमर्सना वावगे ‘टचस्क्रीन’चे

मार्टफोनमुळे गेमिंग इंडस्ट्रीचे मार्केट खूप वाढले. टचस्क्रीन आणि मोशन सेन्सरमुळे व्हिडियोगेमचे वेड अधिक जोरात पसरले. परंतु व्हिडिओ गेमचे खरे फॅन्स मात्र, टचस्क्रीनवर गेम खेळणे जाणीवपूर्वक टाळतात.

‘की प्रेस टायमिंग’चे जजमेंट व्यवस्थित होत नसल्यामुळे प्रोफेशनल गेमर्स टचस्क्रीनऐवजी बटणांच्या आधारे गेम खेळणे पसंद करतात, असे फिनलँड येथील संशोधकांच्या एका टीमने केलेल्या अध्ययनात आढळले .

आल्टो विद्यापीठातील संशोधक सांगतात की, ‘गेममधील आपली हालचाल ‘की प्रेस टायमिंग’वर अवलंबून असते. त्यामुळे जर टायमिंग जितकी जास्त चांगली, तेवढी कामगीरी वाढते.’ हा युक्तिवाद तर ‘ई-बुक वि. छापील पुस्तक’ यासारखाच आहे.

संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना स्कीनवर टार्गेट दिसल्यावर टचस्क्रीन आणि बटण टॅप करण्यास सांगितले होते. फिजिकल बटण आणि टचस्क्रीन टायमिंगमध्ये मोठा फरक दिसून आला. टचस्क्रीनवर गेम खेळताना लोक गल्लत करतात. बटण दाबण्यासाठी फिजिकल अवस्था अधिक प्रभावी ठरली.

Web Title: Gadgets Wave's 'Touchscreen'