शहरं
Join us  
Trending Stories
1
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
2
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
3
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
4
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
5
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
6
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
7
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
8
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
9
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
10
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
11
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
12
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
13
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
14
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
15
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
16
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
17
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
18
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
19
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
20
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
Daily Top 2Weekly Top 5

​गुगल अलर्टचा निर्माता करतोय शेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 22:40 IST

जर तुम्हाला सांगितले की गुगलमधील गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून एक जण शेती करतोय तर तुम्ही काय म्हणाल?

कोणला गुगलमध्ये नोकरी करायला आवडणार नाही? भारतातील टॉप कॉलेजमधील विद्यार्थी तर गुगलमध्ये नोकरी मिळावी म्हणून जीवाचा आटापीटा करतात.

जर तुम्हाला सांगितले की गुगलमधील गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून एक जण शेती करतोय तर तुम्ही काय म्हणाल?

शक्यच नाही!!

पण हे खरं आहे. नागा कटारू त्याचे नाव आहे. भारतीयवंशाचा नागा ‘गुगल अलर्ट’चा निर्माता म्हणून ओळखला जातो. 2000 साली त्याने गुगलमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली होती तेव्हा तो कंपनीत रुजू झालेला केवळ चाळीसवा कर्मचारी होेता. गुगल त्यावेळी आजच्या एवढी मोठी कंपनी नव्हती.

आंध्रप्रदेशमधील गम्पालगुडेम गावात नागाचे बालपण गेले. वडिल शाळेचे हेडमास्तर होते. तो सांगतो, ‘शिक्षणाच्याबाबतीत आमचे गाव फार मागासलेले होते. केवळ अर्धेच मुलं रोज शाळेत हजर राहत असत. परंतु मी शिकावे हा वडिलांचा आग्रह होता. म्हणून मी कॉम्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विषयात इंजिनियरिंग केल्यानंतर आयआयटीमध्ये प्रवेश घेतला.’


(कॉलेजमध्ये असताना नागा कटारू)

कॉलेज जीवनात नागाचा कॉम्प्युटरशी प्रथम संबंध आला. ‘आयआयटी’नंतर त्याची गुगलमध्ये निवड करण्यात आली. तो म्हणतो, ‘गुगलमध्ये आल्यावर खऱ्या अर्थाने माझ्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळाला. सतत काही तरी नवी करण्याचा, नवे जाणून घेण्याचे खुले स्वातंत्र्य मी प्रथमच येथे अनुभवले.’

‘गुगल अलर्ट’ची निर्मिती कथा सांगताना नागा सांगतो, ‘सर्वात आधी मी जेव्हा गुगल अलर्टची संकल्पना माझ्या वरिष्ठासमोर मांडली तेव्हा त्याने साफ फेटाळून लावली. त्याच्या मते, लोक गोष्टी जाणून घेण्यासाठी गुगलकडे येतात. आपणच जर त्यांना स्वत:हून माहिती पुरवू लागलो तर लोक कशाला गुगलवर सर्च करतील? अशाने कंपनीचा व्यावसाय कसा होणार?’

पण या नकारामुळे नागा खचुन नाही गेला. स्वत:च्या संकल्पनेवर त्याला पूर्ण विश्वास होता. म्हणून तो थेट कंपनीचे संस्थापक सर्जी बिन आणि लॅरी पेजकडे गेला. त्यांना ‘गुगल अलर्ट’ची संकल्पना समजावून सांगितली. दोघांनाही ती खूप आवडली. त्याचे पेटंटही नागाला मिळाले. 2003 मध्ये ‘गुगल अलर्ट’ लाँच झाल्यापासून कोट्यावधी लोक त्याचा वापर करत आहे.


(2000 मध्ये नागा कटारूची गुगलमध्ये निवड झाली)

भारतातील एका छोट्याशा खेड्यातून आलेल्या 25 वर्षीय नागासाठी ही खूप गोष्ट होती. आठ वर्षे गुगलमध्ये नोकरी केल्यानंतर त्याला काही तरी नवे करण्याची ओढ शांत बसू देईना. तो म्हणतो, ‘माझ्य डोक्यात विचारांची घुसमट होत होती. आतापर्यंत मी केवळ एकाच गोष्टीत मी लक्ष देत होतो. आयुष्याच्या इतर वाटादेखील मला धुंडाळायच्या होत्या.’

डोक्यात जेव्हा विचारांचे काहूर माजू लागले तेव्हा त्याने नोकरीचा राजीनामा दिला आणि माहितीपट निर्मिती आणि नाट्यक्षेत्रात उडी घेतली. काही वर्षे ते केल्यानंतर नागाने कॅलिफोर्नियातील मोडेस्टो येथे 320 एकर शेती विकत घेतली. तो सांगतो, ‘शेती मला भारत व्यतीत केलेल्या बालपणाची आठवण करून देते. पण शेती करण्याचा माझ्या विचार नव्हता. मला वाटले पाच वर्षानंतर जास्त किंमतीत ती विकून टाकेल.’

येथेसुद्धाा आयुष्याने पुन्हा एकदा नवे वळण घेतले. त्याने शेतजमीन विकण्याऐवजी तेथे बादामाची शेती सुरू केली. शेतीमधले त्याला काही कळत नव्हते. पण आवडीमुळे अभ्यास करून त्याने स्वत:ला शिकवले. आजच्या घडीला नागा शेतीमधून सुमारे 15 कोटी रुपयांचे (2.5 मिलियन डॉलर्स) वार्षिक उत्पन्न घेतो. त्याच्या शेतावर आठ कर्मचारी काम करतात.


(2001 साली नागाचे गुगल आॅफिस)

एवढे करूनही नागा शांत बसण्याच्या मुडमध्ये नाही. त्याचे पुढचे ध्येय म्हणजे शेतीला अधिक टेक्नो सॅव्ही करणे. त्यासाठी तो सध्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातून इन्वायरन्मेन्ट अँड रिसोर्सेस विषयात एमएस आणि एमबीए करत आहे. तो म्हणतो, सिलिकॉन व्हॅलीपासून इतक्या जवळ असुनही शेतीमध्ये म्हणावा तितका तंत्रज्ञानाचा वापर होतान दिसत नाही. एक तंत्रज्ञ म्हणून यामध्ये सुधार करण्याचा मी प्रयत्न करत आहे.

काय म्हणावे अशा अवलियाला? अशा ध्येयवेड्या तरुणांचा आदर्श आपण सर्वांनीच घ्यायला पाहिजे.


(आपल्या बदामाच्या शेतात नागा कटारू)

Photo Credit : Naga Kataru