शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

हॉलिवूडमध्येही यशस्वी होणार दीपिका-प्रियंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 05:51 IST

हॉलिवूडमधील चित्रपटात नायिका होण्याचा पहिला मान ऐश्वर्या रॉयला मिळतो

- दोन्ही नायिकांच्या चाहत्यांनी व्यक्त केला विश्वासभारतीय सिनेमाने आता एका शतकाचा प्रवास पूर्ण केला आहे. मुकपट, बोलपट, संगीतप्रधान चित्रपटांपासून तर नव्या तंत्रज्ञान व व्हिज्युअल इफेक्टचा वापर करून तयार करण्यात आलेल्या सिनेमापर्यंतचा हा प्रवास थक्क करायला लावणारा आहे. येथील कलावंतांनीही अमर्याद लोकप्रियता मिळवली आहे. त्यांची ही ख्याती आता साता समुद्रापार पोहोचली असून जगातील सर्वांत मोठी फिल्म इंडस्ट्री असलेल्या हॉलिवूडनेही बॉलिवूडच्या कलाकारांची दखल घेतली आहे.अमरीश पुरी, कबीर बेदी, नसिरुद्दीन शहा, ओम पुरी, इरफान खान, अनुपम खेर या कलावंताच्या पाठोपाठ बॉलिवूडच्या नायिकांनी देखील बॉलिवूडमध्ये आपले पाय घट्ट रोवले आहेत. प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण यांची तर हॉलिवूडमध्ये विशेष चर्चा सुरू आहे. याच विषयावर सीएनएक्सने त्यांच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता या दोन्ही नायिका हॉलिवूडमध्ये यशस्वी होतील, असा विश्वास व्यक्त केला. हॉलिवूडमधील चित्रपटात नायिका होण्याचा पहिला मान ऐश्वर्या रॉयला मिळतो. कॉमेडियन स्टिव्ह मार्टीनसोबतच्या ‘पिंक पँथर-2’ या चित्रपटातून तिने हॉलिवूडमध्ये पदार्पन केले. यानंतर ब्राईड अ‍ॅण्ड प्रिटड्युजेस, मिस्ट्रेस आॅफ स्पाईस व प्रोव्होक्ड या चित्रपटातून तिने भूमिका केल्या.तब्बूने नेमसेक व लाईफ आॅफ पाय या चित्रपटात भूमिका केल्या, मल्लीका शेरावत जॅकी चॅनच्या मिथ व हिस्स या चित्रपटात दिसली. राणी मुखर्जी हिने अमेरिकन टीव्ही मालिकेत भूमिका के ली आहे. प्रियंका चोप्रा हिने कॉन्टिको या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली. या मालिकेसाठी तिला पिपल्स चॉईस अवॉर्डही मिळाला. ड्वेन जॉन्ससोबत बे-बॉच या चित्रपटात भूमिका करणार आहे. दीपिका पदुकोणची या मालिकेत सर्वाधिक चर्चा होत आहे यामागचे कारणही तसेच आहे. हॉलिवूड अ‍ॅक्शन स्टार वीन डिझेलच्या आगामी ट्रिपल एक्स, द रिर्टन आॅफ झेंटर केज या चित्रपटात ती नायिका आहे. आता तर श्रीलंकन सुंदरी व बॉलिवूड स्टार जॅकलीन फर्नाडिझ देखील हॉलिवूडपटात काम करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.