डेव्हिड बॅकहॅम व्हेरी सेक्सी मॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:58 IST2016-01-16T01:13:47+5:302016-02-07T05:58:27+5:30

अनेक वर्षे फुटबॉल चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या डेव्हिड बे...

David Behme VERY Sexy Man | डेव्हिड बॅकहॅम व्हेरी सेक्सी मॅन

डेव्हिड बॅकहॅम व्हेरी सेक्सी मॅन


/>अनेक वर्षे फुटबॉल चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या डेव्हिड बेकहॅमची भुरळ अजूनही कमी झालेली नाही. चाळीस वर्षीय बेकहॅमला पीपल मॅगझीनने जगातील सर्वात सेक्सी पुरुष म्हणून घोषित केले आहे. चार मुलांचा पिता असलेला बेकहॅम इंग्लंडचा स्टार फुटबॉल प्लेयर होता. गेल्या वर्षी हॉलिवूड स्टार ख्रिस हेम्सवर्थची निवड करण्यात आली होती.
मॅगझीनने बेकहॅमची निवड करण्या मागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, तो केवळ ग्रेट खेळाडूच नाही तर एक उत्तम पिता आणि पती आहे.
ज्यापद्धतीने तो कुटुंब सांभाळतो त्याची प्रशंसा केली पाहिजे. एवढा मोठा स्टार असूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत. त्याचे सार्वजनिक जीवनही वादांपासून दूर आहे. मुलांशी त्याचे नाते आणि पत्नी व्हिक्टोरियाला असणारा खंबीर पाठिंबा असे आदर्श पुरुषांतील सवरेत्तम गुण त्यांच्यामध्ये आहेत.

Web Title: David Behme VERY Sexy Man