असे आहे भज्जी, गीताच्या लग्नाचे कार्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:26 IST2016-01-16T01:19:46+5:302016-02-07T14:26:15+5:30

क्रिकेटर हरभजन सिंग याचे लग्न २९ ऑक्टोबर रोजी अभिनेत्री ...

This is Bhajji, Gita's wedding card! | असे आहे भज्जी, गीताच्या लग्नाचे कार्ड!

असे आहे भज्जी, गीताच्या लग्नाचे कार्ड!

रिकेटर हरभजन सिंग याचे लग्न २९ ऑक्टोबर रोजी अभिनेत्री आणि मॉडेल गीता बसरा सोबत होणार आहे. लग्न दोन महिन्यांपूर्वीच नक्की करण्यात आले होते. त्यावेळीही हीच तिथी सांगण्यात येत होती. परंतु, काही फाईनल झाले नाही.

त्यांच्या लग्नाचे कार्ड आता समोर आले आहे. दक्षिण अफ्रिक येथील भारत दौर्‍याचे कारण सांगून यात बदल करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. लग्नाचे कार्ड समोर आल्याने सर्वच शंका दूर झाल्या आहेत. भज्जीच्या टिवटर अकाऊंटवर लग्नाच्या कार्डने वातावरण हॉट केले आहे. हरभजन सध्या धर्मशाळेत आहेत. त्यावर त्यांनी काहीही टिवट केलेले नाही. लग्न केव्हा आणि कोठे होईल याविषयी खुलासा भज्जी करणार आहे. लग्न जालंधर मध्येच होणार असून दोन्ही घरांमध्ये तयारी जोरदार सुरू आहे.

Web Title: This is Bhajji, Gita's wedding card!