शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

ऑलराऊंडर दीपिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 08:23 IST

ऑलराऊंडर दीपिका!भारताची अव्वल स्क्वॅश खेळाडू म्हणून दीपिका पल्लिकल प्रसिद्ध आहे. पण तिची ओळख एवढीच र्मयादित नाही. अर्जुन अवॉर्ड हा भारताच्या क्रीडाक्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार तिच्या नावे आहे

भारताची अव्वल स्क्वॅश खेळाडू म्हणून दीपिका पल्लिकल प्रसिद्ध आहे. पण तिची ओळख एवढीच र्मयादित नाही. अर्जुन अवॉर्ड हा भारताच्या क्रीडाक्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार तिच्या नावे आहे. जागतिक महिला स्क्वॅश खेळाडूंच्या 'टॉप टेन' यादीत स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. या जबरदस्त कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने दीपिकाला पद्मश्री पुरस्कारानेही गौरवले आहे. दीपिकाचे क्षेत्र केवळ खेळापर्यंतच र्मयादित नाही. ती प्रोफेशनल मॉडेल आहे आणि बिझनस वूमनदेखील! तिचा स्वत:चा लोगोदेखील आहे. वयाची चोविशी पार करेपर्यंत इतके कतरूत्व गाजवले असले तरी, दीपिका यावरच समाधानी नाही. तिला आणखी पुढे मजल मारायची आहे, पण पाय जमिनीवर ठेवून..मल्याळी-सिरियन ख्रिश्‍चन कुटुंबात २१ सप्टेबर १९९१मध्ये जन्मलेल्या दीपिकाने सहाव्या वर्षापासून स्क्वॅश खेळायला प्रारंभ केला. लंडनमध्ये आपली पहिली व्यावसायिक स्पर्धा खेळली तेव्हा ती केवळ सहावीत होती. त्यानंतर लवकरच तिने र्जमन ओपन, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, स्कॉटिश ओपन या ज्युनिअर स्तरावरील स्पर्धा जिंकून जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. २0१२ मध्ये दीपिकाने जागतिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक दिली होती. २0१४मध्ये ज्योत्स्ना चिनप्पाच्या साथीत तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारातील सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.