शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

Fact Check : बाजारात आलीय ३५० रुपयांची नवीन नोट? दावा करणारी पोस्ट बनावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 14:26 IST

Fact Check : नुकताच सोशल मीडियावर ३५० रुपयांच्या नोटांचा दावा करण्यात येत आहे. व्हायरल फोटोत ३५० रुपयांच्या नोटांची बंडले दिसत आहेत.

Claim Review : बाजारात ३५० रुपयांच्या नोटा?
Claimed By : facebook User
Fact Check : चूक

Created By: पीटीआय 
Translated By: ऑनलाईन लोकमत

100, 200 रुपयांच्या नोटा सध्या चलनात आहेत. आणखी काही रकमेच्या नोटांचे फोटो व्हायरल करून बाजारात येणार असल्याचे दावे केले जातात. नुकताच सोशल मीडियावर ३५० रुपयांच्या नोटांचा दावा करण्यात येत आहे. व्हायरल फोटोत ३५० रुपयांच्या नोटांची बंडले दिसत आहेत. हा दावा खोटा असल्याचे पीटीआय फॅक्ट चेकमध्ये समोर आले आहे.  

फॅक्टचेकमध्ये हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. रिझर्व्ह बँकेने ३५० रुपयांच्या नवा नोटा जारी करण्याची सूचना जारी केलेली नाही, असे समोर आले आहे. 

दावा:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरील एका वापरकर्त्याने १० मार्च २०२५ रोजी एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये लिहिले होते, "बाजारात एक नवीन गोष्ट आली आहे," ज्यामध्ये ३५० रुपयांच्या नोटा आणि दोन नोटांचे बंडल दिसत आहेत. पोस्ट लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पहा.

दुसऱ्या एका वापरकर्त्याने ८ मार्च २०२५ रोजी फेसबुकवर त्याच दाव्यासह व्हायरल झालेला फोटो शेअर केला आहे. 

पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने संबंधित कीवर्डसह गुगल ओपन सर्च केले परंतु त्यांना कोणताही विश्वासार्ह मीडियाची बातमी सापडली नाही. RBI च्या अधिकृत वेबसाइटवरही तपासले असता काहीही आढळले नाही. ३५० रुपयांच्या नोटेचे असे कोणतेही चित्र दिसले नाही. 

आरबीआयच्या (एफएक्यू) विभागात चलनात असलेल्या नोटांमध्ये ₹१०, ₹२०, ₹५०, ₹१००, ₹२००, ₹५०० आणि ₹२००० च्या नमूद आहेत. यामुळे या सर्व सर्चवरून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ३५० रुपयांच्या नोटेची पोस्ट ही पूर्णपणे खोटी आहे, असे समोर येत आहे. 

(सदर फॅक्ट चेक पीटीआय या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल