शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी हितासाठी प्राध्यापक भरती प्रक्रियेचे कालबद्ध नियोजन करा- मंत्री चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 21:16 IST

Maharashtra Education Chandrakant Patil: विद्यापीठे, संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापक भरतीला शासनाची मान्यता

Maharashtra Education Chandrakant Patil: राज्यातील विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापक पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून ही भरती प्रक्रिया कालबद्ध नियोजन करून पूर्ण करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू व प्र-कुलगुरूंची राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे तसेच अकृषी विद्यापीठांचे सर्व कुलगुरू, प्र-कुलगुरू व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील विद्यापीठांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रमवारीत (रँकिंग) वाढविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. विद्यापीठांनी कालबद्ध नियोजन करून शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनवृद्धी, अध्यापनातील नावीन्य आणि प्रशासकीय कार्यक्षमता यांना प्राधान्य द्यावे. गुणवत्ता वृद्धीसाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. बैठकीत प्राध्यापक भरती प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील रिक्त पदांची माहिती संकलित करून नियमानुसार भरती प्रक्रिया राबवावी, असे निर्देश देण्यात आले. सर्व संबंधित संस्थांनी प्राध्यापक भरती प्रक्रिया जून २०२६ पर्यंत पूर्ण करावी, असेही स्पष्ट करण्यात आले.

निर्धारित मुदतीपर्यंत प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांतील पदसंख्या कमी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही मंत्री पाटील यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Expedite Professor Recruitment for Student Welfare: Minister Chandrakant Patil

Web Summary : Minister Patil directs universities to complete professor recruitment by June 2026 to improve education quality and rankings. He emphasized implementing the National Education Policy 2020 effectively, warning of consequences for delays. The decision aims to address faculty shortages and enhance student outcomes across Maharashtra's higher education institutions.
टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलEducationशिक्षणTeacherशिक्षकjobनोकरी