शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएस प्रवेशाचे भीषण वास्तव उघड; सरकारी प्रवेश ५०४ गुणांवर, खासगीचा कटऑफ ११८ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 06:24 IST

संस्थात्मक स्तरावर प्रवेशावेळी  राज्य कोट्यातील जागांचा कटऑफ ११८ पर्यंत घसरला. त्यामुळे ‘नीट’मध्ये देशपातळीवर १२ लाख ७४ हजार रँकवर असलेल्या विद्यार्थ्यालाही प्रवेश मिळाला.

मुंबई : राज्यात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा असताना सरकारी कॉलेजांमध्ये खुल्या वर्गातील कटऑफ ५०४ गुणांवर पोहोचले आहे. त्याचवेळी खासगी कॉलेजांमध्ये मात्र राज्य कोट्यातील जागांवरील खुल्या प्रवर्गाचा कटऑफ ११८ पर्यंत घसरला आहे.  

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) राबविलेल्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा ८,५३५ जागा होत्या. त्यात सरकारी कॉलेजांमध्ये ४,९३६, तर खासगी कॉलेजांमध्ये ३,५९९ जागा होत्या. या सर्व जागा भरल्या आहेत. यामध्ये सीईटी सेलमार्फत राबविलेल्या कॅप फेऱ्यांमध्ये प्रवेशासाठी मोठी चढाओढ होती. कॅपवेळी सरकारी आणि खासगी कॉलेजांचे कटऑफ अधिक होते. मात्र काही कॉलेजेस न्यायालयात गेल्यानंतर यंदा कॅप फेऱ्यांनंतर रिक्त राहिलेल्या जागा संस्थात्मक स्तरावर भरण्याची मुभा त्यांना मिळाली. त्यानंतर संस्थात्मक स्तरावर प्रवेशावेळी  राज्य कोट्यातील जागांचा कटऑफ ११८ पर्यंत घसरला. त्यामुळे ‘नीट’मध्ये देशपातळीवर १२ लाख ७४ हजार रँकवर असलेल्या विद्यार्थ्यालाही प्रवेश मिळाला.

दरम्यान, सिंधुदुर्गमधील एसएसपीएम मेडिकल कॉलेजमध्ये ११८ गुणांवर एका विद्यार्थ्याला प्रवेश दिला आहे. राज्य कोट्यातील जागेवर संस्थात्मक स्तरावरील फेरीत हा प्रवेश दिला आहे.

‘एमबीबीएस’ कॅपच्या चौथ्या फेरीपर्यंत सर्व कॉलेजांचे कटऑफ जवळपास ४००च्या पुढे होते. मात्र, खासगी महाविद्यालये संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांमध्ये गुणवत्ता डावलून प्रवेश देतात. विद्यार्थ्यांकडे लाखो रुपये मागितल्याच्या तक्रारीही दरवर्षी होतात. त्यामुळे या महाविद्यालयांची संस्थात्मक स्तरावरील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय स्तरावरच व्हावी. - सचिन बांगड, समुपदेशक 

राज्य कोट्यातील खासगी कॉलेजांचा कटऑफ ११८ पर्यंत घसरल्याने प्रवेश प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संस्थात्मक स्तरावर प्रवेशावेळी नीटमध्ये ३०० ते ४०० गुण असलेले अनेकजण विविध कॉलेजांमध्ये प्रयत्न करत होते. त्यांनाही प्रवेश मिळला नाही. सीईटी सेल भूमिका घेत नसल्याने महाविद्यालये न्यायालयात दाद मागून संस्थात्मक स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी मिळवितात.- सुधा शेनॉय, पालक प्रतिनिधी

English
हिंदी सारांश
Web Title : MBBS Admissions: Stark Reality Unveiled; Government Cutoff High, Private Plummets

Web Summary : Maharashtra's MBBS admissions reveal disparities. Government college cutoff reached 504, while private colleges saw a shocking 118. Institutional rounds bypassed merit, raising concerns about transparency and affordability. CET Cell's role is questioned as private colleges gain court permissions.
टॅग्स :Admissionप्रवेश प्रक्रिया