शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव अनुदानासाठी शाळांची होणार तपासणी, शिक्षण विभागाच्या पथकाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:29 IST

या प्रत्येक महाविद्यालयासाठी केंद्र शासन १२० कोटी रुपये तर राज्य शासन ३० कोटी रुपये अर्थसहाय्य करणार आहे.

मुंबई :  राज्यातील ज्या शाळांना २० टक्के अनुदान मिळते, त्यांना वाढीव २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय १४ ऑक्टोबर २०२० रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शिक्षण आयुक्तांकडून मूल्यांकन करून सादर करण्यात आलेल्या या शाळांना अनुदान देण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने चार अधिकारी, सदस्यांचा समावेश असलेल्या पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाने शाळांची तपासणी ग्राह्य ठरविल्यानंतरच त्या वाढीव अनुदानासाठी पात्र ठरतील.

पथकामध्ये शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव पथकप्रमुख असतील, तर दोन कक्ष अधिकाऱ्यांचा सदस्य म्हणून समावेश असेल. संबंधित जिल्ह्यातील प्राथमिक/माध्यमिक शिक्षणाधिकारीही पथकातील सदस्य असतील. पथक शाळेत जाण्यापूर्वी शाळेला पूर्वसूचना देण्यात येणार असून, तेव्हा शाळेने आवश्यक सर्व कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक असल्याच्या सूचना सहसचिवांनी दिल्या. शाळांच्या तपासणीवेळी कागदपत्रे किंवा माहिती अपुरी असल्यास शाळा वाढीव अनुदानासाठी अपात्र ठरविण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा एकूण २,१६५ शाळांना २० टक्के आणि याआधीच २० टक्के अनुदान घेणाऱ्या २,४१७ शाळांना अतिरिक्त २० टक्के अनुदान १ नोव्हेंबर २०२० पासून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ एकूण ४३ हजार ११२ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होईल.

कोविड उपचारासाठी वापर या प्रत्येक महाविद्यालयासाठी केंद्र शासन १२० कोटी रुपये तर राज्य शासन ३० कोटी रुपये अर्थसहाय्य करणार आहे. सध्या औरंगाबाद येथील बांधकाम ९५ टक्के पूर्ण झाले असून यवतमाळ येथील बांधकामही जवळपास पूर्ण झाले आहे. लातूर आणि अकोला येथील महाविद्यालयाच्या इमारती पूर्ण झाल्या असून कोविड उपचारासाठी त्या वापरात आहेत. नव्याने सुरू होणाऱ्या अतिविशेषोपचार रुग्णालयांमध्ये हृदयरोगचिकित्सा, पिंडचिकित्सा, मूत्र रोगशल्यचिकित्सा, मज्जातंतु शल्यचिकित्सा, नवजात शिशु अतिदक्षता विभाग आदी सेवा असतील.

टॅग्स :Teacherशिक्षक